Satpuda Ghat News Saam Tv
देश विदेश

Satpuda Ghat News : भीक मागून मिळालेल्या पैशांतून खड्डे बुजवले; सातवीच्या विद्यार्थ्यानं प्रशासनाच्या डोळ्यात घातलं झणझणीत अंजन

Satpuda Hills : सातपुड्यातील चांदसैली घाटातील जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढले असताना, सातवीत शिकणारा आदिवासी मुलगा देवसिंग पावरा स्वतः भीक मागून रस्त्यावरील खड्डे बुजवत आहे.

Alisha Khedekar

  • चांदसैली घाटातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब असून खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.

  • सातवीत शिकणाऱ्या देवसिंग पावरा या आदिवासी मुलाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.

  • तो प्रवाशांकडून मदत घेऊन त्या पैशांतून माती विकत घेऊन रस्त्याची डागडुजी करतो.

  • या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित होत असून, ही जागृतीची वेळ आहे.

सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या चांदसैली घाटात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. घाटात खोलवर खड्डे पडले असून, प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात त्यांचे जीव धोक्यात येत आहेत. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून काहीच ठोस कारवाई झालेली नाही. अशा स्थितीत जेव्हा एखादा चिमुकला या कामाची जबाबदारी स्वतःवर घेतो तेव्हा ती एक लाजिरवाणी जाणीव निर्माण करते.

सातवीत शिकणारा आदिवासी कुटुंबातील देवसिंग पावरा हा इतर मुलांसारखा शाळा सुटल्यावर खेळायला जात नाही. त्याऐवजी तो आपल्या हातात फावडा घेतो आणि चांदसैली घाटात पडलेल्या खड्ड्यांवर माती टाकत त्यांना बुजवतो. विशेष म्हणजे हे काम तो कोणाच्या सांगण्यावरून करत नाही, तर स्वतःच्या सामाजिक जाणिवेतून करतो. रस्त्यावर येणाऱ्या प्रवाशांकडून तो पैसे मागतो. पण ही भीक स्वतःसाठी नाही. तो त्या पैशांतून माती किंवा वाळू विकत घेतो आणि घाटातील खड्ड्यांवर टाकतो.

देवसिंगचा हा प्रयत्न पाहून अनेक प्रवासी थांबतात, त्याला पैसे देतात, कौतुक करतात. पण याच कौतुकाच्या पलीकडे एक कटू वास्तव उभं राहतं. ते म्हणजे एका लहान मुलाला खड्डे बुजवावे लागतील इतकी निरुत्तर आणि बेफिकीर यंत्रणा, ही प्रशासनासाठी धोक्याची घंटा नाही का?

सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक प्रशासन, आणि लोकप्रतिनिधींना या घटनेने खडबडून जाग यायला हवी. या घाटावरून दररोज शेकडो लोकांचा प्रवास होतो. त्यांचं सुरक्षिततेचं जबाबदारी कोणाची? एक लहान मुलगा ती पेलू शकतो, पण शासन यंत्रणा मात्र हातावर हात ठेवून बसलेली आहे.

देवसिंग पावरा याने दाखवलेली ही संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी केवळ कौतुकास्पद नाही, तर ती प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. त्याने दाखवलेला मार्ग प्रशासनासाठी आरसा ठरावा. ही घटना केवळ रस्त्याची नाही, ती संवेदनशील मनाची आहे. चांदसैली घाटातील खड्ड्यांपेक्षा मोठा खड्डा जर कुठे आहे, तर तो व्यवस्थेच्या जबाबदारीत . आणि तो खड्डा भरून काढणं हे आता काळाची गरज आहे.

देवसिंग पावरा कोण आहे?

देवसिंग पावरा हा सातवीत शिकणारा आदिवासी मुलगा आहे जो चांदसैली घाटातील खड्डे बुजवण्याचे काम करतो.

तो खड्डे कसे बुजवतो?

तो प्रवाशांकडून मदत मागतो आणि त्या पैशांतून माती किंवा वाळू घेऊन खड्डे बुजवतो.

प्रशासनाने काय पावले उचलली आहेत?

सध्या प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

या घटनेचे सामाजिक महत्व काय आहे?

ही घटना लहान वयात सामाजिक जबाबदारी स्वीकारल्याचे उदाहरण असून, ती शासनासाठी एक आरसा ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT