CM Eknath Shinde on Narendra Modi Parliament video Saam TV
देश विदेश

Eknath Shinde Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संसदेत शेरेबाजी; कौतुक ऐकून मोदीही भारावले, पाहा VIDEO

CM Eknath Shinde on Narendra Modi Parliament video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक देखील केलं. त्यांनी मोदींसाठी शेरेबाजी देखील केली.

Satish Daud

लोकसभा निवडणूक निकालात बहुतमाचा आकडा पार केल्यानंतर आज भाजप प्रणित एनडीएतील घटकपक्षांची संसदेत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी सर्व खासदारांची उपस्थिती होती. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एकमताने गटनेता म्हणून निवड करण्यात आली. आता लवकरच भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. येत्या ९ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असं सांगण्यात आलं आहे.

नरेंद्र मोदी यांचं आज संसदेत आगमन होताच एनडीएमधील सर्व खासदारांनी टाळ्यांच्या कडकडाटासह त्यांचं स्वागत केलं. यावेळी संसदेत मोदी-मोदी असा आवाज घुमत होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणं केली. यावेळी शिंदेंनी मोदींसाठी शेरेबाजी देखील केली.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

"संसदेतील गटनेते म्हणून पंतप्रधान मोदी यांना आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने समर्थन देतो. भाजप-शिवसेना युती हा फेव्हिकॉलचा जोड है तुटेंगा नहीं, गेल्या १० वर्षात मोदींनी देशाचा विकास केला असून अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. त्यामुळे आज संपूर्ण जगात भारताचं नाव आघाडीवर" असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

"मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी निवडणुकीत पंतप्रधानांबाबत अनेक अफवा पसरवल्या. पण मतदारांनी त्यांना नाकारलं आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा बहुतमाने निवडून दिलं. आता त्यांचं पुढे काय होणार आहे हे नितीश कुमार यांनी सांगितलंच आहे", असा टोला शिंदेंनी लगावला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक देखील केलं. त्यांनी मोदींसाठी शेरेबाजी केली. "मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है… बंजर माटी में पलकर मैंने…मृत्यु से जीवन खींचा है… ।मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ… शीशे से कब तक तोड़ोगे.. मिटने वाला मैं नाम नहीं… तुम मुझको कब तक रोकोगे…" असं शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEED: मॅरेथॉनसाठी हायवेवर धावण्याची प्रॅक्टिस, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; शिक्षकांची अजब उत्तरं; VIDEO व्हायरल

Video : लोकसभेत गदारोळात मला मारहाण केली, जोरात ढकललं; महिला खासदाराचे केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप

LICची मोठी घोषणा! बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी, १७ सप्टेंबरपर्यंत मिळणार विशेष सवलती

Online Gaming Regulation Bill: ऑनलाइन गेमिंगचा सरकारकडून 'गेम'; दोन्ही सभागृहात ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर

निवडणुकीत ठाकरेंचा पराभव, एकनाथ शिंदे म्हणाले... | VIDEO

SCROLL FOR NEXT