Maharashtra Politics Saam tv
देश विदेश

Maharashtra Politics : विधानसभेसाठी दिल्लीत खलबतं! निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेत्यांमध्ये बैठकीत काय चर्चा झाली? VIDEO

Congress Delhi Meeting : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर काँग्रेस नेत्यांमध्ये महत्वाची चर्चा झाली. या बैठकीत काँग्रेसच्या वरिष्ठांनी राज्यातील नेत्यांना महत्वाच्या सूचना दिल्यात.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही सक्रिय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून दिल्लीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत जागावाटपासहित राजकीय समीकरणाची चर्चा झाली. तसेच राज्यातील काही जागांवरील तिढा सोडवावा, अशी मागणी राज्यातील नेत्यांनी वरिष्ठांकडे केली आहे.

सूत्रांनी माहितीनुसार, काँग्रेस नेत्यांची राज्यातील जागावाटपाच्या तिढ्यावर दिल्लीत चर्चा झाली. काही जागांचा तिढा राज्यात सुटत नसल्याने केंद्रीय नेतृत्वाने लक्ष घालण्याविषयी चर्चा झालीय. राज्यातील नेत्यांनी १५ जागांचा तिढा केंद्रीय नेतृत्वाने दिल्लीत सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षांकडे एकमुखाने मागणी केली. या मागणीनंतर केंद्रीय नेतृत्व हस्तक्षेप करून तिढा सोडवेल, तुम्ही निवडणुकीच्या बाकी कामाला लागा, अशा सूचना काँग्रेसच्या वरिष्ठांनी राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत.

बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांनी हरियाणातील पराभवाचा धसका घेतला आहे. 'महाराष्ट्राचा हरियाणा होऊ द्यायचा नाही, असं म्हणणं बैठकीत नेत्यांनी मांडलं. महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी वादाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने काँग्रेस नेतृत्व अलर्ट मोडवर आहे. तर मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजात समन्वय राहील याची काळजी घ्या, अशा सूचना नेत्यांना देण्यात आल्या आहेत. 'कुठल्याही परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडीच सरकार आणायचंच आहे, अशाही सूचना काँग्रेसच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बैठकीत जाहीरनाम्यावर काय चर्चा झाली?

आज दिल्लीतील बैठकीत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही चर्चा झाली. या बैठकीत जाहिरनाम्यात काय असणार, याबाबत चर्चा झाली. कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजना, महालक्ष्मी योजना, स्री सन्मान योजना,कुटुंब रक्षण, युवकांसाठी योजना, समतेची हमी अशा विविध योजनेवर चर्चा झाली. कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं ३ लाखापर्यंत कर्ज माफ केलं जाणार आहे. तर ही कर्जमाफी साधारण २८ हजार कोटींची असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT