Maharashtra Politics: शेतकरी नेते रविकांत तुपकर मातोश्रीवर! 'मविआ'सोबत जाण्याबाबत ठाकरेंशी चर्चा; पडद्यामागे काय घडतंय?

Maharashtra Assembly Election 2024: शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी राज्यात २५ ठिकाणी उमेदवार उभे करण्याच्या अनुषंगाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. बुलढाणा, वर्धा, वाशिम, लातूर, हिंगोली यासह विविध जिल्ह्यात तुपकरांनी मेळावे व सभांचा धडाका सुरू केला आहे.
Maharashtra Politics: शेतकरी नेते रविकांत तुपकर मातोश्रीवर! मविआसोबत जाण्याबाबत ठाकरेंशी चर्चा; पडद्यामागे काय घडतंय?
Maharashtra Assembly Election 2024: Saamtv
Published On

संजय जाधव, बुलढाणा

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकरांना सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. याबाबत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि रविकांत तुपकर यांची मातोश्रीवर भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. रविकांत तुपकरांना सोबत घेण्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना ठाकरे गटामध्ये एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Maharashtra Politics: शेतकरी नेते रविकांत तुपकर मातोश्रीवर! मविआसोबत जाण्याबाबत ठाकरेंशी चर्चा; पडद्यामागे काय घडतंय?
Maharashtra Politics: अजित पवारांचा मतदारसंघ ठरला! प्रफुल पटेलांनी केली उमेदवारीची घोषणा; महायुतीचे २३५ उमेदवारही 'या' दिवशी ठरणार

विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी राज्यात २५ ठिकाणी उमेदवार उभे करण्याच्या अनुषंगाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. बुलढाणा, वर्धा, वाशिम, लातूर, हिंगोली यासह विविध जिल्ह्यात तुपकरांनी मेळावे व सभांचा धडाका सुरू केला आहे. राज्यात विविध शेतकरी संघटनांची तिसरी आघाडी झाली असून ही 'परिवर्तन महाशक्ती'आघाडी महाविकास आघाडीला डॅमेज करणार आहे. अशातच आता रविकांत तुपकर यांना सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

अलिकडेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी विधानसभेला मविआसोबत येण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात रविकांत तुपकर यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मत विभाजन आणि नुकसान टाळण्यासाठी रविकांत तुपकर यांना सोबत घेण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीत सकारात्मक चर्चा होत असल्याची माहिती आहे.

Maharashtra Politics: शेतकरी नेते रविकांत तुपकर मातोश्रीवर! मविआसोबत जाण्याबाबत ठाकरेंशी चर्चा; पडद्यामागे काय घडतंय?
Sanjay Raut News: 'काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर..' संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान; हरियाणा निकालावरुन साधला निशाणा

दरम्यान, रविकांत तुपकरांची राज्यातील शेतकरी व तरुणांमध्ये एक क्रेज आहे. लोकसभेत बुलडाणा मतदार संघात अपक्ष निवडणुक लढवून तुपकरांनी अडीच लाख मते घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीशी कडवी झुंज दिली. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी जवळपास अडीच लाख मते घेतली. दुसरीकडे रविकांत तुपकर हे महाराष्ट्र दौरा करत असून जवळपास २५ जागांवर उमेदवार देण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मतांचे विभाजन टाळण्यासाठी मविआने ही रणनिती आखली आहे.

Maharashtra Politics: शेतकरी नेते रविकांत तुपकर मातोश्रीवर! मविआसोबत जाण्याबाबत ठाकरेंशी चर्चा; पडद्यामागे काय घडतंय?
Maharashtra Politics: 'आप'चा मोर्चा पुण्याकडे, सर्व जागा लढवणार, मविआला फटका बसणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com