Kalyan News : कल्याण ग्रामीण विधानसभा जागेवरून रस्सीखेच; भाजपनेही ठोकला दावा, कार्यकर्तेही आग्रही

Kalyan News : कल्याण पूर्वेत भाजपच्या कल्याण ग्रामीणमधील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यानी ही जागा भाजपने लढवावी असा आग्रह धरला आहे
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख
कल्याण
: विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहिर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. त्यातच कल्याण ग्रामीण विधानसभा भाजपकरीता सोडण्यात यावी; अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. कमळ असेल तर आम्ही काम करु अशी भूमिका घेतली आहे.

कल्याण पूर्वेत (Kalyan News) भाजपच्या कल्याण ग्रामीणमधील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यानी ही जागा भाजपने (BJP) लढवावी असा आग्रह धरला आहे. कल्याण ग्रा्मीण विधानसभा मतदार संघात मनसेचे आमदार राजू पाटील आहे. २००९ साली राजू पाटील यांचे मोठे बंधू रमेश पाटील हे मनसेकडून निवडून आले. २०१४ साली शिवसेनेचे सुभाष भोईर निवडून आले होते. २०१९ मध्ये मनसेचे राजू पाटील निवडून आले. यंदा या जागेकरीता महायुतीत रस्सीखेच सुरु झाली आहे.

Kalyan News
Sambhajiraje Chatrapati : शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही; संभाजीराजे छत्रपती यांचा आरोप

कोणत्याही परिस्थिती हि जागा भाजपला मिळाली पाहिजे. २०१४ मध्ये भाजपचा उमेदवार नसल्याने १० हजार मतदारांनी नोटाला मतदान केले. ज्याठिकाणी कमळ नव्हते. त्याठिकाणी नाेटा चालला. यंदा ही जागा भाजपला सोडण्यात यावी; अशी मागणी केली. मंंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामाध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ् बावनकुळे यांच्याकडे केली जाणार असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी या मतदारसंघात भाजपची ताकद आहे. या मतदारसंघात दोन वेळा (Shiv sena) शिवसेनेचा पराभव झाला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा; अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे अशी मागणी करण्यात गैर काहीच नाही असं सांगितलं. मात्र भाजपच्या या भूमिकेवर शिवसेनेकडून सावध पावित्रा घेण्यात आला आहे. शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी कुणाला जागा द्यायची, नाही द्यायची हे महायुतीमधील वरिष्ठ नेते ठरवतील. आम्ही युती धर्मात लढणार आणि महाराष्ट्रात युतिचा मुख्यमंत्री बसवणार असे मोरे यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com