Mahakumbh Train Saam Tv
देश विदेश

Mahakumbh Train: पुणे, सातारा, सांगलीवरुन महाकुंभमेळ्यासाठी ६ विशेष रेल्वे

Mahakumbh 2025 Special Train: प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी जाण्यासाठी हुबळी ते वाराणसी अशा ६ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे.

Siddhi Hande

प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु आहे. रोज कोट्यवधी भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी जातात. फक्त वेगवेगळ्या राज्यातून नव्हे तर देशविदेशातून भाविक महाकुंभमेळ्यासाठी येत आहेत. दरम्यान, महाकुंभमेळ्यासाठी जाण्यासाठी विशेष हुबळी ते वाराणसी अशा सहा रेल्वे फेऱ्या होणार आहेत.

प्रयागराज येथील महाकुंभमेळा २०२५ साठी हुबळी ते वाराणसी दरम्यान सहा फेऱ्या होणार आहेत.ही ट्रेन पुण्यासह सातारा, दौंड, मिरज, सांगली,अहिल्यानगर येथून धावणार आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना प्रयागराजला जाण्यासाठी विशेष गाडी उपलब्ध झाली आहे. (Maha Kumbh 2025)

प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हुबळी-वाराणसी विशेष ट्रेन धावणार आहे.त्यामध्ये ट्रेन क्रमांक ०७३८३ ही विशेष रेल्वे गाडी १४, २१ आणि २८ रोजी हुबळी येथून सकाळी आठ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता वाराणसी येथे पोहचेल.

ट्रेन क्रमांक ०७३८४ ही विशेष गाडी १७ आणि २४ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी वाराणसी येथून सकाळी पाच वाजता सुटेल व हुबळी येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी पोहचेल.

या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ११ शयनयान, १ सामान्य द्वितीय सिटिंग असलेली गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार असेल. ही ट्रेन मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड आणि भुसावळ मार्गे धावणार आहे.

तसेच बिदर ते दानापूर विशेष दोन फेऱ्या, चर्लपल्ली ते दानापूर विशेष चार फेऱ्या आणि मछलीपट्टनम ते दानापूर विशेष चार फेऱ्या असणार आहेत. दरम्यान, मध्य रेल्वे महाकुंभ मेळासाठी ४२ विशेष गाड्या चालवत आहे, त्यापैकी १८ फेऱ्या मुंबई ते बनारस/मऊ दरम्यान, १२ नागपूर ते दानापूर दरम्यान आणि १२ पुणे ते मऊ दरम्यान गाड्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT