PM Modi News : पंतप्रधान मोदींच्या विमानावर हल्ल्याची धमकी; मुंबई कनेक्शन आलं समोर

Mumbai Police : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होणार असल्याची फोन करून धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याची चौकशी करण्यात येत आहे.
Prime Minister Modi
Prime Minister ModiGoogle
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानावर हल्ला होण्याची धमकी पोलिसांना मिळाली होती. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा फोन आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ सूत्रे हालवत चेंबूर परिसरातून एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संशयीत आरोपीची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावेळी विमानावर हल्ला करण्यात येणार आहे, असा एका फोन मुंबई पोलिसांना आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून सुरक्षा एजन्सीला अलर्ट करण्यात आले होते. त्यानंतर तात्काळ फोन कऱणाऱ्याचा शोध सुरू केला. पोलिसांना हा फोन चेंबूरमधून करण्यात आल्याचे समजले. पोलिसांनी चेंबूर येथून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेय.

Prime Minister Modi
Crime : वहिनीला एकटं पाहून दीराचा संयम सुटला, बलात्कार केला अन्...

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत, त्यानंतर ते अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्याआधी दहशतवादी हल्ल्याची धमकी पोलिसांना मिळाली. ११ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये एका अज्ञात व्यक्तीने फोन करत दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांकडून तात्काळ सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देत तपास सुरू कऱण्यात आला होता.

Prime Minister Modi
Maharashtra Politics : शरद पवारांवर ठाकरे नाराज, संजय राऊतांनी केली जळजळीत टीका

पंतप्रधान मोदींवर दहशतवादी हल्ल्याचं प्रकरण गांभिर्याने घेत पोलिसांनी इतर सुरक्षा एजन्सीला माहिती देत तपास सुरू केला. मुंबई पोलिसांनी याबाबत सांगितले की, ज्या व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये फोन केला तो धमकीचा होता. त्याला चेंबूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. तो व्यक्ती मानसिक आजारी असल्याचे समजतेय.

Prime Minister Modi
Narendra Modi France Visit : AI मुळे नोकऱ्या जाणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "सगळ्यात मोठी भीती.."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com