Maha Kumbh Traffic Jam Saam Tv
देश विदेश

Maha Kumbh Traffic Jam: बापरे! 300 किमी ट्रॅफिकजॅम, प्रयागराज ते मध्य प्रदेश वाहनांच्या रांगा; जगातलं सर्वात मोठं ट्रॅफिकजॅम, पाहा VIDEO

Maha Kumbh Traffic Jam Update: महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांमुळे मध्यप्रदेशात २०० ते ३०० किलो मीटरपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे. या वाहतूक कोंडीमुळे भाविकांचे प्रचंड हाल होत आहे.

Priya More

प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यामध्ये भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. देशभरातील सर्वच राज्यातून भाविक मोठ्या संख्येने प्रयागराजमध्ये येत आहेत. त्यामुळे प्रयागराजसह उत्तर प्रदेशच्या सीमेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. उत्तर प्रदेशच्या सीमेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मध्यप्रदेशवरून येणाऱ्या भाविकाची संख्या जास्त आहे. महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांमुळे मध्यप्रदेशात २०० ते ३०० किलो मीटरपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे. या वाहतूक कोंडीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यात पोलिसांच्या वाहनांमधून सोमवारपर्यंत वाहतूक बंद असल्याची घोषणा करण्यात येत आहे. मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यातील पोलिसांनी वाहनांना कटनी आणि जबलपूरकडे परत जाण्याचे आणि तिथेच थांबण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक कोंडीमुळे एकाच ठिकाणी अडकून राहिल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. ना अन्न ना पाणी यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. वाहतूक कोंडीमुळे १२ ते १५ तासांपर्यंत भाविक एकाच ठिकाणी अडकून राहिले आहेत. यामध्ये वयोवृद्धांपासून ते महिला आणि लहान मुलांचे देखील समावेश आहे.

प्रयागराज महाकुंभात भाविकांची गर्दी सतत वाढत आहे. गर्दी पाहून प्रशासन सतर्क झाले आहे. यामुळे सीमावर्ती जिल्ह्यांमधून लोक परत येऊ लागले आहेत. प्रयागराजचे संगम स्टेशन १४ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहे. रेल्वेचे तिकिट उपलब्ध नसल्यामुळे भाविक महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी खासगी वाहनांनीही येत आहेत. त्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या वेळीही शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. गर्दीमुळे लोक तासंतास वाहतूक कोंडीत अडकत आहेत. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रयागराजमधील वाहतूक कोंडीचे भयान वास्तव सांगितले आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'प्रयागराजमध्ये सर्वत्र वाहतूक कोंडीमुळे अन्नधान्य, भाजीपाला, मसाले मिळत नाहीत. औषधे, पेट्रोल-डिझेल मिळत नाहीत. यामुळे, प्रयागराज आणि महाकुंभ परिसरात आणि प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अडकलेल्या कोट्यावधी भुकेल्या, तहानलेल्या, थकलेल्या भाविकांची अवस्था प्रत्येक तासाला बिकट होत चालली आहे. ही एक अतिशय गंभीर परिस्थिती आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT