Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यासाठी रेल्वेच्या विशेष सेवा, महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जाणार? वाचा सविस्तर

Mahakumbh 2025 Latest News : महाकुंभमेळ्यासाठी रेल्वेच्या विशेष सेवा चालवण्यात येणार आहे. महाकुंभमेळ्यासाठी राज्यातील विविध शहरातून रेल्वे जाणार आहे. वाचा रेल्वेचं वेळापत्रक.
Mahakumbh
Mahakumbh 2025Saam tv
Published On

महाकुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेच्या विशेष सेवा चालवण्यात येणार आहे. प्रयागराजमधील या भव्यदिव्य सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून रेल्वेच्या ८ अतिरिक्त विशेष सेवा चालवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील भाविकांची संख्या लक्षात घेऊन रेल्वेच्या विशेष सेवांची सोय करण्यात आली आहे.

मध्य रेल्वे प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळा २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि बनारस तसेच नागपूर आणि दानापूरदरम्यान ८ अतिरिक्त विशेष सेवा चालवण्यात येणार आहे. रेल्वेने विशेष सोय केल्याने भाविकांना मोठा फायदा होणार आहे.

Mahakumbh
Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ११५४ जागांसाठी भरती; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

१) लोकमान्य टिळक टर्मिनस - बनारस कुंभमेळा विशेष (४ सेवा)

01031 कुंभमेळा विशेष गाडी दि. ०५.०२.२०२५ आणि दि. ०८.०२.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.०५ वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)

01032 कुंभमेळा विशेष ट्रेन दि. ०६.०२.२०२५ आणि दि. ०९.०२.२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता बनारस येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १६.४० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर आणि चुनार

संरचना कशी असेल?

दोन वातानुकूलित द्वितीय, सहा वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ६ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

Mahakumbh
Railway Recruitment: रेल्वेची सर्वात मोठी भरती! ३२४३८ रिक्त जागा; पात्रता काय? कोणत्या पदासाठी किती पगार? जाणून घ्या सर्वकाही

२) नागपूर - दानापूर कुंभमेळा विशेष (दोन ट्रेन आणि ४ सेवा)

01201 कुंभमेळा विशेष गाडी ०५.०२.२०२५ रोजी नागपूर येथून दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी ११.५० वाजता पोहोचेल. (१ सेवा)

01202 कुंभमेळा विशेष गाडी ०६.०२.२०२५ रोजी दानापूर येथून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल. (१ सेवा)

01203 कुंभमेळा विशेष ट्रेन ०८.०२.२०२५ रोजी दुपारी ३ वाजता नागपूर येथून सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता पोहोचेल. (१ सेवा)

01204 कुंभमेळा विशेष ट्रेन ०९.०२.२०२५ रोजी दुपारी २.३० वाजता दानापूर येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल. (१ सेवा)

थांबे: गोंदिया, बालाघाट, नैनपूर, घानसोर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, चुनार, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.

संरचना कशी असेल?

दोन प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, एक वातानुकूलित द्वितीय, २ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, ९ वातानुकूलित तृतीय, ४ शयनयान आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

Mahakumbh
Railway News: लोकलचे रूपडे पालटणार! CSMT, कुर्ला आणि कल्याणच्या गर्दीवर उतारा, रेल्वे मंत्र्यांनी सांगितला मास्टर प्लान

आरक्षण : कुंभमेळा विशेष ट्रेन क्रमांक 01031, 01201 आणि 01203 साठी सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर विशेष शुल्कासह बुकिंग सुरू आहे. या विशेष गाड्यांमध्ये, सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित कोच म्हणून चालवले जातील आणि तिकिटे यूटीएसद्वारे बुक करता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com