Maha Kumbh Stampede Saam Tv
देश विदेश

Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्यात 30 भाविकांचा मृत्यू, अमृतस्नानाचा हट्ट बेतला जीवावर; VIDEO

Maha Kumbh Stampede: महाकुंभमेळ्यात अमृतस्नानासाठी निघालेल्या गर्दीत चेंगराचेंगरीची दुर्घटना घडलीय. यात 30 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. मात्र मध्यरात्री 1 वाजता काय घडलं? याआधीही अशी दुर्घटना किती वेळा घडल्या आहेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

महाकुंभमेळ्यातील अमृतस्नानासाठी प्रयागराजमध्ये संगमावर लाखोंची गर्दी उसळली. पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. मात्र गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेल्याने बॅरिकेड्स तुटले आणि गंगा किणाऱ्यावर मृत्यूचं तांडव पहायला मिळालं. महाकुंभातील चेंगराचेंगरीत 20 पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जातेय. त्यामुळे गंगा किणाऱ्यावर बम बम भोलेच्या जयघोषाऐवजी लोकांचा आक्रोश आणि अ‍ॅम्बुलन्सचा आवाज ऐकायला येत होता. मात्र महाकुंभात मध्यरात्री 1 वाजता नेमकं काय घडलं? पाहूयात.

महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी

- संगमघाटावर मौनी अमावस्येनिमित्त अमृतस्नान

- अमृतस्नानासाठी लाखो भाविकांची गर्दी

- संगमघाटावर गर्दी वाढल्यानं भाविकांची पळापळ

- 20 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती

- जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडोर

महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान मोदींनी योगी आदित्यनाथ यांच्याकडून दुर्घटनेची माहिती घेतलीय.. एवढंच नाही तर या दुर्घटनेनंतर सर्व आखाड्यांनी अमृतस्नान रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. महाकुंभमेळ्यात चेंगरा चेंगरीची ही पहिलीच घटना नाही.. यापुर्वीही अशा घटनांमध्ये शेकडो लोकांचा बळी गेल्याचं समोर आलंय.

महाकुंभात 'मृत्यूचा मेळा'

- 3 फेब्रुवारी 1954

प्रयागराज कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीने 800 भाविकांचा मृत्यू

- 14 एप्रिल 1986

हरिद्वार कुंभमेळ्यात नेत्यांमुळे गर्दी रोखली, चेंगराचेंगरीत 200 जणांचा मृत्यू

- 27 ऑगस्ट 2003

नाशिकच्या कुंभमेळ्यात 29 जणांचा मृत्यू, 118 भाविक जखमी

- 14 एप्रिल 2010

हरिद्वार कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू, 15 भाविक जखमी

- 10 फेब्रुवारी 2013

प्रयागराज कुंभमेळ्यात अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 42 ठार

कुंभमेळ्यात वारंवार चेंगराचेंगरीच्या दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे या दुर्घटना रोखण्यावर आणि उपाय सुचवण्यासाठी अनेक समित्या, आयोग स्थापन केले जातात. त्यांचे अहवाल येतात. मात्र त्यानंतरही हा दुर्घटनांचा सिलसिला थांबण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे आतातरी सरकारने चेंगराचेंगरीच्या दुर्घटना रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT