Madras High Court Saam tv
देश विदेश

Madras High Court: 'आई जे करू शकते, ते कोणी करू शकत नाही'; मुलीचा ताबा आईकडे देण्यासंदर्भात हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Madras High Court: पती-पत्नी विभक्त झाल्यास मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा, यावरून कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

Vishal Gangurde

Madras High Court Latest Verdict in Favour of Mother:

एका ८ वर्षांच्या मुलीचा ताबा आईकडे देण्यासंदर्भात मद्रास हायकोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. ८ वर्षांच्या मुलीच्या ताब्यावरून कोर्टाने एक आदेश दिला, त्याचं पित्याला सक्तीने पालन करण्यास सांगितलं. पती-पत्नी विभक्त झाल्यास मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा, यावरून कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

महिलेने तिच्या पतीशी घटस्फोट घेतलाय. या महिलेला ८ वर्षांची मुलगी आहे. मात्र, पतीने मुलीला त्याच्या जवळ ठेवलं होतं. मुलगी लहान असून ती आईशिवाय राहू शकत नाही. तरीही पित्याने मुलीला स्वत: जवळ ठेवलं होतं. यामुळे मुलीच्या आईने हायकोर्टाचा दरवाजा ठोठवला. त्यानंतर हायकोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला. कोर्टाने मुलीचा ताबा आईकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुलीचा ताबा ४ आठवड्यात सोपवण्याचा दिला आदेश

मद्रास उच्च न्यायालयातील हे प्रकरण आहे. मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीश आर सुब्रमण्यम आणि जस्टिस डी नागार्जुन यांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण होतं. या पित्याने त्याच्या मुलीला त्याच्या वृद्ध आई-वडिलांकडे ठेवलं होतं. मात्र, आता खंडपीठाने ८ वर्षांच्या मुलीचा ताबा तिच्या आईकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोर्टाचं म्हणणं काय?

'१० वर्षांहून अधिक कमी वय असलेल्या मुलांचा सांभाळ त्यांची आईच करू शकते. त्यामुळे पती-पत्नी विभक्त झाल्यावर मुलांचा ताबा आईकडे मिळायला हवा, असं मत कोर्टाने व्यक्त केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टॅलिन सॅम्यु्ल आणि ग्रेसी सिल्विया यांचं लग्न २०१४ मध्ये झालं होतं. दोघे काही मुंबईत राहिले, त्यानंतर अमेरिकेला गेले. त्यांना २०२५ मध्ये मुलगी झाली. मात्र, पुढे या दोन्ही जोडप्याचा घटस्फोट झाला. त्यावेळी मुलीचा ताबा वडिलांना मिळाला. या व्यक्तीने मुलीला त्याच्या आई-वडिलांकडे सोपवून अमेरिकेला सोडून निघून गेला.

या मुलीचा पिता तिला २०२० मध्ये अमिरेकेला घेऊन जाणार होता, त्याचवेळी महिलेने कोर्टात धाव घेतली. तेव्हा कोर्टाने या व्यक्तीला मुलीला अमेरिकेला घेऊन जाण्यास रोखलं. यामुळे या व्यक्तीने मुलीचा सांभाळ करण्यासाठी अमिरेकीतील नोकरी सोडली. त्यानंतर त्याने मुंबईला नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र, आता या प्रकरणात कोर्टाने मुलीचा ताबा आईकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : गर्दीपासून दूर, सह्याद्रीच्या कुशीत! नाशिकमधील ७ ऑफबीट किल्ल्यांवर दिवाळीत भटकंती करा

Maharashtra News Live Update: पुण्याच्या मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथील हॉटेलमध्ये तोडफोड

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने समर्थकांसह हाती घेतलं 'कमळ'

Morning Breakfast Recipe: नाश्त्याला दररोज मोड आलेले कडधान्ये खाल्ले तर शरीराला काय फायदा होतो?

Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT