Manasvi Choudhary
मोड आलेले मूग, मटकी, चणे हे कडधान्ये आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात.
अनेक फिटनेसप्रेमी सकाळी नाश्त्याला मिक्स कडधान्ये खातात. नियमितपणे सकाळी नाश्त्याला मोड आलेले कडधान्ये खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात.
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये हाय प्रोटीन्स असतात. प्रथिने आणि फायबरचे प्रमाण अधिक असल्याने शरीरात एनर्जी येते.
मिक्स कडधान्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे सकाळी नाश्त्यात स्प्राउट्स खाल्ल्यावर पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. वारंवार भूक लागत नाही म्हणून वजन नियंत्रणात राहते.
कडधान्यांना मोड आल्यामुळे ते पचायला अतिशय हलके होतात. बद्धकोष्ठता आणि पोटाच्या इतर समस्या दूर होतात.
मिक्स स्प्राऊट्स खाल्ल्याने शरीराला जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात, ज्यामुळे दिवसभर शरीरात उर्जा टिकून राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.