Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

Weatehr Update Today News : देशातील १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत पावसाचा इशारा. महाराष्ट्रासह दक्षिण भारत आणि ईशान्येकडील भागांत पावसाची शक्यता. हवामान विभागाचा ताजा अंदाज जाणून घ्या.
Weather Update News
Weather Update News AI image
Published On: 
Summary
  • भारतीय हवामान विभागाकडून १३ राज्यांना पावसाचा इशारा

  • काही भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

  • पावसासोबत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज

  • महाराष्ट्रासह दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील अनेक भागांत पावसाची शक्यता

देशातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने आज १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसासोबतच ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

१३ राज्यांमध्ये पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दक्षिण भारतातील भागांत पावसाची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रासह अंदमान-निकोबार बेटे आणि ईशान्य भारतातील नागालँड, मणिपूर, मिझोराम व त्रिपुरा या राज्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो.

Weather Update News
Skin Care : नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

डोंगराळ भागांत थंडीची चाहूल

एकीकडे देशाच्या विविध भागांत पावसाचे वातावरण असताना, दुसरीकडे डोंगराळ राज्यांमध्ये हवामानात बदल जाणवू लागला आहे. उंचावरील प्रदेशांमध्ये तापमानात घट होत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. मात्र, पावसामुळे काही डोंगराळ भागांत दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे डोंगराळ रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

Weather Update News
Railway News : रेल्वेचा सर्वात मोठा नियम लागू! ट्रेनमध्ये मोबाईलवर गाणी किंवा व्हिडिओ पाहिला तर होईल तुरुंगवास

मच्छीमारांनाही सावधानतेचा इशारा

समुद्रातील हवामान आणि लाटांची स्थिती लक्षात घेऊन केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टी परिसरातील मच्छीमारांसाठीही हवामान विभागाने सावधगिरीचा इशारा जारी केला आहे. समुद्रात वाऱ्याचा वेग वाढण्याची आणि परिस्थिती प्रतिकूल होण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाण्यापूर्वी हवामानाच्या सूचना तपासाव्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com