नवी दिल्ली : मद्रास हायकोर्टाने लैगिंक शोषणाच्या एका प्रकरणात महत्वाचा निर्णय दिला आहे. गर्लफ्रेंडचं चुंबन आणि मिठी मारणे गुन्हा आहे का, याबाबत मद्रास हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात दोन वर्षांत निर्णय दिला आहे. या प्रकरणात हायकोर्टाने याचिकाकर्त्याविरोधात एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गर्लफ्रेंडचं चुंबन आणि मिठी मारणे गुन्हा नसल्याचे म्हटलं आहे.
मद्रास हायकोर्टाने स्पष्ट केले आहे की, 'दोन लोक जे रिलेशनशिपमध्ये असतात, त्यावेळी ते भावना व्यक्त करत असतात. दोन जणांच्या प्रेमाच्या संबंधात या गोष्टी होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे हा गुन्हा नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, याचिकाकर्त्या व्यक्तीचं नाव संथन गणेश असं आहे. या व्यक्तीच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आली होती. संथनने याचिकेत म्हटलं की, '१३ नोव्हेंबर २०२२ रोजी गर्लफ्रेंडची भेट घेतली. त्यांचासोबत बोलणं झालं. त्यानंतर त्याने तिला मिठी मारून चुंबन घेतलं . यामुळे गर्लफ्रेंड नाराज झाली. त्यामुळे संथनने माफी मागितली. पण संथनच्या गर्लफ्रेंडने तिच्या आई-वडिलांना ही बाब सांगितली.
यादरम्यान गर्लफ्रेंडने त्याच्या लग्न करण्यास नकार दिला. तसेच त्याच्या गर्लफ्रेंडने त्याचाविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करून पोलिसांत एफआयआर दाखल केला. मात्र, याच प्रकरणात संथनला हायकोर्टाने दिलासा दिला आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर त्याच्या विरोधातील एफआयआर रद्द करण्यात आला. ही बाब गुन्हा नसल्याचे म्हणत कोणत्याही कायदेशीर कारवाईची गरज नसल्याचे कोर्टाने म्हटलं.
मीडिया रिपोर्टनुसार, न्यायाधीश आनंद वेंकटेशन यांनी या प्रकरणावर सुनावणी केली.त्यांनी आदेशात म्हटलं की, 'या प्रकरणात आयपीसी कलम ३५४-ए (i) प्रकरणाचा गुन्हा दाखल होतो. लैंगिक शोषणाचा गुन्हा हा पुरुषाने शारीरिक संबंध केल्यानंतर होतो. तरुण आणि तरुणी तारुण्यात प्रेमात पडतात. अशावेळी मिठी मारणे आणि चुंबन घेणे स्वाभाविक गोष्टी आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.