MP Bus Accident Saam tv
देश विदेश

MP Bus Accident : बापरे! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटली, ८ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

MP school Bus Accident update : मध्य प्रदेशमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर ८ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाली आहे.

Vishal Gangurde

बैतूल : मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर त्यातील ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. स्कूल बसच्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये शुक्रवारी स्कूल बस उलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताने ३० विद्यार्थी जखमी झाले असून त्यातील ८ मुलांची प्रकृती प्रकृती गंभीर झाली असल्याची माहिती हाती आली आहे. या अपघातामधील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आली आहेत.

बैतूलमधील निम्नवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. प्रगती हायस्कूल साईखेडाच्या शाळेची बस उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर बोरदेही, आमला, मुलताई या भागातील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर रुग्णवाहिकेने मुलताईच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहोचलं.

जखमी विद्यार्थ्यांनी सांगितलं की, 'बसमध्ये एकूण ३० विद्यार्थी होते. आम्ही बसमधून घरी निघालो होतो. चालकाने बसवरील नियंत्रण गमावलं. त्यानंतर बस उलटली'. विद्यार्थ्यांनी बस चालकावर दारु प्यायलाचाही आरोप केला आहे. दारुच्या नशेत बस चालवत असल्याचा आरोप जखमी विद्यार्थ्यांनी केला आहे. अपघात झाल्यानंतर बसमध्ये एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने बसमधून बाहेर काढलं.

जळगावमधील रेल्वे अपघातात १३ जणांनी गमावले प्राण

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जळगावमध्ये रेल्वेचा अपघात झाल्याची घटना घडली होती. भरधाव कर्नाटक एक्स्प्रेसच्या धडकेत १३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एक्स्प्रेसने चिरडल्याने या प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मृत प्रवाशांंमध्ये नेपाळ आणि उत्तर प्रदेशमधील प्रवासी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT