MP Accident News
MP Accident News Saamtv
देश विदेश

MP Accident News: भीषण अपघात! लग्नाच्या वऱ्हाडावर ट्रक उलटला; ७ जणांचा मृत्यू

Gangappa Pujari

Madhya Pradesh Accident News: मध्यप्रदेशमध्ये एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या सिधी जिल्ह्यात हा अपघात झाला असून यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रक बोलेरो गाडीवर उलटल्याने ही दुर्घटना झाली. या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Accident News)

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी जिल्ह्यात आज एक मोठा रस्ता अपघात झाला. ज्यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले आहेत. सिधी जिल्ह्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील डोल गावाजवळ एक भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन बोलेरो कारवर उलटला. ज्यामध्ये कारमधील लोकांचा चिरडून मृत्यू झाला.

मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. (Accident News)

कारमधील यादव कुटूंब क कुंदौर गावातून सिरसी गावाकडे परत जात होते, असे सांगण्यात येत आहे. एक लग्न समारंभावरुन घरी परतत असताना ही दुर्देवी घटना घडली. भरधाव ट्रकने आधी कारला धडक दिली आणि नंतर तो पलटी झाला, ज्यामध्ये बोलेरो गाडीतील लोक चिरडले गेले. या घटनेनंतर महामार्गावर एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजीची सभा रद्द, भीषण दुष्काळामुळे निर्णय

Eknath Shinde : मोठी बातमी! नाशिकमध्ये हेलिपॅडवर CM शिंदेंच्या बॅगांची तपासणी

Ranjitsinh Naik Nimbalkar : कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावाल तर मुळावर घाव घालू; रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा मोहिते पाटलांना इशारा

Milk Price : दूध उत्पादक शेतकरी आक्रमक; अंगावर दूध ओतून केला सरकारचा निषेध

Supreme Court on PMLA : सुप्रीम कोर्टाची ED अन् तपास यंत्रणांना चपराक; PMLA वर दिला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT