Madhya Pradesh 8 IPS officers transfer list 2026 saam tv
देश विदेश

ऐन दिवाळीत 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

8 IPS Officers Transfer List 2026: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून अवधेश गोस्वामी यांच्यासह कोणत्या अधिकाऱ्याला कुठे नियुक्ती मिळाली? जाणून घ्या संपूर्ण यादी.

Omkar Sonawane

मध्य प्रदेशमध्ये पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पोलिस मुख्यालयाकडून 4 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, एकूण 8 IPS अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने आणि पुढील आदेशापर्यंत नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. पोलीस मुख्यालयात करण्यात आलेल्या या फेरबदलात अवधेश कुमार गोस्वामी यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. डीजीपींचे पीएसओ असलेल्या विनीत कपूर यांना या पदावरून हटवून त्यांच्या जागी अवधेश गोस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अवधेश कुमार गोस्वामी यांना पोलीस मुख्यालय, भोपाळ येथील उपपोलीस महानिरीक्षक (डीआयजी) कल्याण आणि लेखा या पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. आता त्यांच्याकडे डीजीपींचे पीएसओ आणि नार्कोटिक्स शाखेच्या उपपोलीस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे, विनीत कपूर यांची उपपोलीस महानिरीक्षक सायबर आणि सामुदायिक पोलीसिंग या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते डीजीपींचे पीएसओ आणि सामुदायिक पोलीसिंगची जबाबदारी सांभाळत होते. तसेच संतोष सिंह गौर यांची आजाक पोलीस मुख्यालयातून पीटीआरआय पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. तुषार कांत विद्यार्थी यांना पीटीआरआयमधून हटवून विसबल मुख्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर रघुवंश कुमार सिंह यांची पोलीस मुख्यालयात उपपोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अन्य अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. साई कृष्णा थोटा यांची सहायक पोलीस महानिरीक्षक (एआयजी) सायबर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुनीत गहलोत यांच्याकडे एआयजी प्रशासन, तर शशांक यांच्याकडे एआयजी विशेष शाखाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलीस मुख्यालय, भोपाळ येथून जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक (डीजीपी) यांच्या वतीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रभागेचा तीर दिव्यांच्या प्रकाशाने लख्ख

Salman Khan : सलमान खानचा आर्मी लूक पाहून चाहते उत्सुक! 'मातृभूमी'च्या ट्रेलरची खास झलक प्रदर्शित

Home Cleaning : बाथरूम आणि किचनमधील काळी बुरशी कशी काढायची? जाणून घ्या ७ सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

Accident: स्वामींच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला, अपघातात मुंबईतील तिघांचा मृत्यू

फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट; 87 लाख खात्यांत मदत जमा; तुमच्या खात्यात 5 हजार रुपये आले का?

SCROLL FOR NEXT