Madhya Pradesh Car Truck Accident News  Saam TV
देश विदेश

Accident News: ओव्हरटेक करणं जीवावर बेतलं, धावत्या कारवर ट्रक कोसळला; क्षणार्धात अख्खं कुटुंबच संपलं

Madhya Pradesh Accident News: भरधाव वेगात असलेल्या कारचालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी ट्रक अचानक कारवर कोसळला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.

Satish Daud

Madhya Pradesh Car Truck Accident News

वाहन चालवताना एक चूक किती महागात पडू शकते, याचाच प्रत्यय एका अपघातातून आला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारचालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी ट्रक अचानक कारवर कोसळला.

या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामप्रकाश, जय देवी, रोशनी आणि गीता अशी मृतांची नावे आहेत.

सुमित आणि राखी अशी गंभीर जखमी झालेल्या बहिण भावांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड जिल्ह्यातील सारंगपूर येथील रहिवासी असलेले शाक्य कुटुंब अल्टो कारमधून भिंडकडे जात होते.

गुना बायपासवरून जात असताना कारचालकाने कचऱ्याने भरलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अचानक ट्रक कारवर उलटला. या अपघातात कारचा पूर्णत: चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

कारवर पडलेला ट्रक जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आला. सर्व मृत आणि जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. शाक्य कुटुंब मूळ भिंड जिल्ह्यातील लाहार येथील रहिवासी आहे. कुटुंबातील एक सदस्य राजगड जिल्ह्यातील सारंगपूर येथे सरकारी नोकरीला होता. त्यामुळे हे कुटुंब सारंगपूरला राहत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT