हिमाचल प्रदेशमध्ये ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. एकाच वेळी खूप पर्यटक जमल्यामुळे रस्त्यांवर मोठं ट्रॅफिक जाम पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी शेकडो वाहनं रस्त्यावर अडकून पडली होती. ट्रॅफिक जाममधून सुटका करण्यासाठी एका पर्यटकाने मोठा धाडसी मार्ग पत्करला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video)
एक पर्यटक लाहौल खोऱ्यातील चंद्रा नदीत महिंद्रा थार एसयूव्ही चालवताना दिसत आहे. सुदैवाने नदीची पाणीपातळी कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पाणीपातळी जास्त असती तर पर्यटकाचा हा प्रवास जीवघेणा ठरला असला. पर्यटकाच्या या कृतीवर स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रविवार २४ डिसेंबरची ही घटना आहे. लाहौल ते मनाली मार्गावर या पर्यटकाने आपली कार नदीत उतरवली. वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी या पर्यटकाने आपली कार नदीत उतरवली होती. या घटनेनंतर शिमलाचे पोलीस महासंचालक संजय कुंडू यांनी पर्यटकांना सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत कुल्लू, लाहौल आणि स्पिती यांना जोडणाऱ्या रोहतांगमधील अटल बोगद्यातून सुमारे 55 हजार वाहने गेली आहेत. एकाच वेळी अनेक रस्त्यांवर असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या आठवड्यात एक लाखाहून अधिक वाहने शिमल्यात दाखल होऊ शकतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सुमारे 60 हजार वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. वीकेंडच्या दिवशी सरासरी 12 हजार वाहने शिमल्यात येतात. सीजनमध्ये ही संख्या 26 हजारांपेक्षा जास्त असते. त्यामुळे एवढी मोठी गर्दी मॅनेज करणे प्रशासनासमोरील मोठं आव्हान आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.