Breaking News: फ्रान्समध्ये अडकून पडलेल्या २७६ भारतीयांची सुटका; ४ दिवसानंतर विमान मुंबईत परतले

Indian Aircraft Returned From France: फ्रान्समध्ये अडकून पडलेले विमान मंगळवारी पहाटे मुंबईत उतरले आहे. मायदेशी परतताच भारतीय प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.
Indian Aircraft Returned From France
Indian Aircraft Returned From FranceSaam TV
Published On

Indian Aircraft Returned From France

मानवी तस्करीच्या संशयावरून गेल्या ४ दिवसांपासून फ्रान्समध्ये भारतीय विमान अडकून पडले होते. या विमानात एकूण ३०३ भारतीय प्रवासी होते. या प्रवाशांना भारतात परत आणण्याचे भारत सरकारचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. आज म्हणजेच मंगळवारी पहाटे हे विमान मुंबईत उतरले आहे. मायदेशी परतताच भारतीय प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Indian Aircraft Returned From France
Israel Hamas War: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर ठार; युद्ध आणखीच भडकण्याची शक्यता

एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. वृत्तानुसार, फ्रान्समध्ये अडकून पडलेल्या विमानामध्ये ३०३ भारतीय होते. यापैकी २७६ भारतीय मुंबईत परतले आहेत. तर दोन अल्पवयीन प्रवाशांसह २५ प्रवासी फ्रान्समध्येच थांबून आहेत. त्यांनी फ्रान्सकडे आश्रयासाठी अर्ज केला होता.

२३ डिसेंबर रोजी दुबई येथून भारतीय नागरिकांना निकाग्वारकडे जाण्यासाठी निघालं होतं. मात्र, तांत्रिक दुरुस्तीसाठी विमान फ्रान्सच्या वॅट्री विमानतळावर उतरवण्यात आलं. दरम्यान, विमानाचा वापर मानवी तस्करीसाठी केला जात असल्याचा संशय फ्रान्सच्या तपास यंत्रणांना आला होता.

त्यानंतर फ्रान्सच्या सुरक्षा यंत्रणांनी विमान ताब्यात घेत तपास सुरू केला. सर्व प्रवाशांना विमानतळावरील रिसेप्शन हॉलमधून थांबवण्यात आलं होतं. फ्रान्सने भारतीय विमान रोखताच दिल्लीपासून पॅरिसपर्यंत मोठी खळबळ उडाली होती. या विमानाला भारतात आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू होते.

दरम्यान, फ्रान्सच्या न्यायालयाच्या आदेशानंतर या विमानाला भारताकडे उड्डाण भरण्याची परवानगी देण्यात आली. चार न्यायाधीशांनी ताब्यात घेतलेल्या प्रवाशांची चौकशी केल्यानंतर विमान सोडण्याचे आदेश दिले. सोमवारी सकाळी फ्रान्समधील वाट्री विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले. मंगळवारी पहाटे २७६ प्रवाशांसह हे विमान मुंबई उतरलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com