Madhya Pradesh News Saam Tv
देश विदेश

Seoni News: हृदयद्रावक घटना! तलावात आंघोळीला गेलेली ४ मुले घरी परतलीच नाहीत; संपूर्ण गावावर शोककळा

MP News: सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास धोबीसरा ते दरासी रस्त्यावरील तलावाबाहेर मुले आढळून आली.

Gangappa Pujari

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील सिवनी येथून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. सिवनीच्या कुरई पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या धोबीसरा गावात चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.. (MP Latest News)

पाण्याचा अंदाज न आल्याने घडला अनर्थ...

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी गावातील काही मुले गावाजवळील तलावात आंघोळीसाठी गेली होती. चांगला पाऊस झाल्याने तलाव 10 फुटांपर्यंत पाण्याने भरला होता. मुलांना अंदाज न आल्याने ती पोहता पोहता खोल पाण्यात बुडाली.

हृतिक चक्रवर्ती (१०), आयुष विश्वकर्मा (८), आरव तुमराम (५.५) आणि ऋषभ विश्वकर्मा (५) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. सर्व मुलांचे वय अवघे ५ ते १० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चारही मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

संपूर्ण गाव शोकसागरात...

शेतातून घरी आल्यानंतर पालकांना मुले घरात न आढळल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास धोबीसरा ते दरासी रस्त्यावरील तलावाबाहेर मुले आढळून आली. चारही मुले बुडून मृत्यू पावल्याचे समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. दरम्यान, सोमवारी सकाळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. तसेच पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT