मध्य प्रदेशमध्ये ईडीने मोठी कारवाई केली आहे. या छापेमारीदरम्यान ईडीने ३०० किलो सोनं-चांदी, १० कोटींपेक्षा जास्त पैसे जप्त केले. केंद्रीय तपास यंत्रणेने परिवहन विभागाचे माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्मा यांच्या घरावर छापेमारी केली. याप्रकरणी सौरभ शर्मा आणि त्यांचे सहकारी चेतन सिंग गौर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छापेमारीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना एक डायरी सापडली. या डायरीमध्ये दरवर्षी जवळपास १०० कोटी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे.
सौरभ शर्मा यांच्या घरावर छापा टाकून कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता ईडी याप्रकरणाची मनी लाँड्रिंगच्या अँगलने चौकशी करणार आहेत. मुख्य आरोपी सौरभ शर्मा सध्या दुबईत असल्याची चर्चा होत आहे. अवघ्या वर्षभरामध्ये कॉन्स्टेबलच्या असणाऱ्या सौरभ शर्माने व्हीआरएस घेतली. त्यांच्याकडे असणारी अफाट संपत्ती पाहून लोकायुक्त, पोलिस, आयकर आणि ईडीचे अधिकारी आश्चर्यचकीत झाले आहेत.
गुरुवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सौरभ शर्मा यांच्या घरावर छापा टाकण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून अद्यापही वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारी रात्रीच भोपाळमधून एक कार जप्त करण्यात आली होती ज्यामध्ये ५२ किलो सोने आणि ९.८६ किलो रोकड सापडली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान एक डायरी देखील सापडली आहे ज्यामध्ये वार्षिक सुमारे १०० कोटी रुपयांच्या व्यवहारांची नोंद आहे. ज्या कारमधून सोनं जप्त करण्यात आला होती ती कार चेतनसिंग गौर यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. सौरभ आणि चेतन हे दोघेही मूळचे ग्वाल्हेरचे असून व्यावसायिक मित्र असल्याचे सांगितले जाते. वर्षभरापूर्वी व्हीआरएस घेतल्यानंतर सौरभ शर्मा प्रॉपर्टीच्या व्यवसायातही उतरला.
ईडीने आतापर्यंत केलेल्या कारवाईतून जप्त करण्यात आलेल्या सर्व मालमत्तेचा खरा मालक सौरभ आहे की आणखी कुणी याची माहिती अद्याप समोर आली नाही. या प्रकरणाशी परिवहन विभागातील काही वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांचाही संबंध असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. भोपाळच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, सौरभ शर्मा हा कॉन्स्टेबल असतानाही परिवहन विभागातील काही बड्या अधिकाऱ्यांच्या जवळचा होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.