Nandurbar Crime News Saam tv
देश विदेश

Bhopal News: एका चुकीनं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; आधी मुलांना विष पाजलं, नंतर पती-पत्नीने मृत्यूला कवटाळलं

आत्महत्येपूर्वी पीडित व्यक्तीने चिठ्ठी लिहली होती तसेच पोलिसांना घटनास्थळी सेल्फॉसच्या गोळ्याही आढळून आल्या आहेत

Gangappa Pujari

Madhya Pradesh Crime News: मध्यप्रदेशमधून (Madhya Pradesh) एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये दोन मुलांसह पती- पत्नीने आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.

एकाच कुटूंबातील चौघांनी टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या सामूहिक आत्महत्येचे धक्कादायक कारण पोलीस तपासात समोर आले आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशची राजधानी (Bhopal) भोपाळमध्ये दोन लहान मुलांसह पती पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपाळच्या रातीबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना घडली. पोलिसांना घटनास्थळी नोटही आढळून आली आहे.

पती-पत्नीने अगोदर ८ वर्षाच्या मुलाला आणि नंतर ३ वर्षाच्या मुलाला सल्फासच्या गोळ्या खायला दिल्या. त्यानंतर, पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी पीडित व्यक्तीने सुसाईड नोट लिहली होती तसेच पोलिसांना घटनास्थळी सेल्फॉसच्या गोळ्याही आढळून आल्या आहेत.

धक्कादायक कारण समोर..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती एका खासगी इन्शुरन्स कंपनीसाठी काम करत होता. मात्र, आर्थिक नुकसान झाल्यामुळे ते फेडण्यासाठी त्याने कर्ज काढले होते. मात्र, कर्ज काढल्यानंतर तो अधिकच कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला. कर्जाचे हफ्ते थकत गेले आणि कर्ज वाढत गेल्यामुळे अखेर पीडित व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

Sambhajinagar News : उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगास नोटीस; १५ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मतदानाचा प्रश्न

SCROLL FOR NEXT