Rajasthan Viral Video: ऑनलाईन गेमचा नाद नडला! १४ वर्षीय मुलाची झाली भयंकर अवस्था; मानसिक संतुलन गमावलं अन्.. पाहा VIDEO

Internet Gaming Disorder Rajasthan Viral Video: मुलांच्या हातात सतत मोबाईल दिल्याने काय अवस्था होवू शकते; याचाच हा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे...
Viral Video News
Viral Video NewsSaamtv
Published On

Video Game Addiction Viral Video : सध्या तरुणाईला लागलेले मोबाईलचे वेड चिंताजनक आहे. ऑनलाईन गेमच्या नादात लहान मुले सतत मोबाईलचा वापर करत असतात. ज्याचे अनेक विपरीत परिणाम मुलांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.

कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले. त्यामुळे लहान मुलांना फ्री फायर पबजी सारख्या ऑनलाईन गेम खेळण्याचे व्यसन लागले. मात्र या ऑनलाईन गेमिंगचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होतो. याचाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Child Physical and Mental Condition Deteriorated Due To Online Gaming)

Viral Video News
PSI Pallavi Jadhav Song Viral Video: 'मी लेक भीमाची...'; PSI पल्लवी जाधवने गायलं सुमधुर गाणं, व्हिडिओ व्हायरल

गेमच्या व्यसनाने बिघडलं संतुलन...

राजस्थानमधील (Rajasthan) एका मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. हा मुलगा फ्री- फायर गेमच्या (Online Game) इतका आहारी गेला की त्याचे मानसुक संतुलन पुर्णपणे बिघडले. सतत गेम खेळल्याने या मुलाची अवस्था अशी झाली की त्याचे अंग थरथरत आहे, तसेच तो अधून मधून फायर फायर असे ओरडताना ही दिसत आहे.

गेमच्या आहारी जावून मुलाची शेवटी अशी अवस्था झाली की त्याला एका वसतीगृहात डांबून ठेवण्याची वेळ त्याच्या आई वडिलांवर आली. हा मुलगा सातव्या इयत्तेत शिकत असून गेल्या सात महिन्यांपासून तो मोबाईल वापरत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Viral Video News
Girl Holds 3 Tyres Viral Video: नाद करा पण आमचा कुठं; पहिलवानालाही लाजवेल असा तरुणीचा नादखुळा प्लँक VIDEO व्हायरल

या मुलाचे आई सफाई कामगार आणि वडील रिक्षा चालक आहेत. त्यामुळे ते सकाळीच कामासाठी घरातून निघून जायाचे. अशावेळी मुलगा घरात एकटाच असायचा. त्यामुळे त्याला मोबाईलचे प्रचंड वेड लागले.

धक्कादायक बाब म्हणजे पालकांनी मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो घरही सोडून गेला होता.अखेर त्याचा पालकांना त्याला जयपूर रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता त्याचावर अलवरच्या स्कीम क्रमांक 8 मधील वसतिगृहात ठेवण्यात आलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com