Kuno National Park Latest News Saamtv
देश विदेश

Kuno Cheetah Death: चिंता वाढली! कुनो नॅशनल पार्कमध्ये 'सूरज'चा मृत्यू, ४ महिन्यांत ८ चित्ते दगावले

The African Cheetah Suraj Was Found Dead: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून चित्ते आणले होते.

Gangappa Pujari

Kuno National Park Latest News: मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात (Madhya Pradesh Kuno Sanctuary) आणखी एका चित्त्याचा (Cheetah) मृत्यू झाल्याची बातमी समोर आहे. गेल्या तीन महिन्यात ८ चित्त्यांचा इथं मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. आफ्रिकेतून आणलेल्या नर चित्ता सूरजचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सापडला. कुनो पार्कमध्ये गेल्या चार महिन्यांत आठ चित्ते मरण पावले आहेत, तर या आठवड्यात मरण पावलेला हा दुसरा चित्ता आहे.

सूरजच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यापूर्वी मंगळवारी तेजस या नर चित्त्याचा मृत्यू झाला होता. मादी चित्यासोबत झालेल्या हिंसक झुंजीत तो जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला.

दरम्यान, आतापर्यंत कुनो अभयारण्यात (Kuno National Park) ८ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. वारंवार चित्त्यांच्या मृत्यूच्या घटना घडत असल्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोट्यवधी खर्च करुन आफ्रिकेतील नामिबियातून हे चित्ते आणण्यात आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून चित्ते आणले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या फोटोवर जादूटोणा? मोदींच्या फोटोजवळ हळद-कुंकू, लिंबू आणि नारळ; घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT