Madhya Pradesh Saam tv
देश विदेश

Madhya Pradesh: मजुरीच्या पहिल्याच दिवशी लखपती; खाणीत सापडला तब्बल ४० लाखांचा हिरा | VIDEO

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये एका तरुणाचे नशीब चमकलं आहे. एका रात्रीत हा मजुर लाखो रुपयांचा मालक झाला आहे. त्याला खदाणीत एक हिरा सापडला आहे.

Siddhi Hande

मध्यप्रदेशच्या मजूराचं नशीब एका रात्रीत पालटलंय. खाणीत कामाच्या पहिल्याच दिवशी 40 लाखांचा हिरा सापडलाय. याबाबत पाहूया एक सविस्तर रिपोर्ट

रात्रीत नशीब उजळलं, मजूर झाला लखपती !

ही कहाणी आहे मध्यप्रदेश मधल्या एका आदिवासी मजूराची..... हिऱ्याच्या खाणीत काम करताना, एका मजूराला तब्बल 40 लाखांचा हिरा सापडलाय... जगप्रसिद्ध पन्ना येथील कृष्णा कल्याणपूर पट्टीमधील उथळ खाणीतील ही घटना आहे.

हा अमूल्य हिरा 11 कॅरेट 95 सेंटचा आहे. विशेष म्हणजे खाणीत खोदकाम करण्याचा माधव नावाच्या मजूराचा पहिलाच दिवस होता. पहिल्याच दिवशी सापडलेल्या या किमती हिऱ्यामुळे या मजुराचं जीवनच पालटलंय.

हिऱ्याचा होणार लिलाव? मजुराला किती फायदा ?

खाणीतून हिरा सापडताच युवकाने पन्ना शहरात असलेल्या हिरा भांडारात आपल्याला गवसलेलं अमूल्य रत्न जमा केलंय.. जवाहिराने या हिऱ्याची अंदाजे किंमत 40 लाख रुपये इतकी सांगितली आहे. कोळशाच्या खाणीत हिरा प्राथमिक स्वरूपात सापडल्यानंतर त्यावर अनेक प्रक्रिया होतात. अखेरीस या स्फटिकासारख्या दिसणाऱ्या हिऱ्याला पैलू पाडण्यात येतात. हे काम झाल्यानंतर बाजारात त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावात मिळालेल्या रक्कमेतून 12.5% रॉयल्टी वजा करून उर्वरित सगळी रक्कम या मजूराला मिळणार आहे.

पन्नाच्या या हिरा खाणीने आजवर अनेकांचे नशीब उजळले आहे. या खाणीत अनेकांना अमुल्य हिरे गवसले आहेत. या खाणीत अनेकांनी आजवर आपले नशीब आजमावून पाहिलंय.. या खाणीने अनेकांनी स्वप्न दाखवलीयेत. आजही या खाणीत अनेकजण आपले नशीब शोधण्यासाठी मोठ्या हिमतीने खोदकाम करतात. यावरून हेच सिद्ध होते की, मेहनत करणाऱ्यांची हार होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter List : मतदार यादीमध्ये मोठा घोटाळा, एकाच घरात तब्बल ४,२७१ मतदार

Latur Tourism : महाराष्ट्रातील 'हा' किल्ला फार कमी लोकांना माहित असेल, लातूरला जाऊन एकदा पाहाच

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Sanjay Mishra : संजय मिश्राने मढ आयलंडमध्ये घेतलं लग्जरी अपार्टमेंट, किंमत वाचून बसेल धक्का

मुंबईहून पुण्याला जाताना आक्रीत घडलं, ४ तरूणांच्या कारचा चक्काचूर; भयंकर अपघात दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT