Madhya Pradesh High Court News Saamtv
देश विदेश

MP High Court News: 'चांगल्या घरातील मुलगा आहे' पोक्सोतील आरोपीला हायकोर्टाकडून एका अटीवर जामीन; रुग्णालयात सेवा करण्याची शिक्षा

Madhya Pradesh High Court News: 'मुलगा चांगल्या घरातील आहे', त्याला सुधारण्याची एक संधी दिली पाहिजे, अशी महत्वपूर्ण टिप्पणी करत मध्यप्रदेश हायकोर्टाने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचे आरोप असलेल्या तरुणाला जामीन मंजूर केला.

Gangappa Pujari

मध्यप्रदेश, ता. २३, मे २०२४

अल्पवयीन मुलीला अश्लिल कॉल करुन वारंवार त्रास दिल्याप्रकरणी अटक असलेल्या आरोपीला मध्यप्रदेश हायकोर्टाने जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे हा जामीन देताना न्यायालयाने 'मुलगा चांगल्या घरातील आहे', त्याला सुधारण्याची एक संधी दिली पाहिजे, अशी महत्वपूर्ण टिप्पणी केली. तसेच आरोपीला दोन महिने भोपालच्या रुग्णालयात सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे.

एकीकडे पुण्यातील पोर्शे अपघातात निबंध लिहण्याची शिक्षा दिल्यानंतर मध्यप्रदेशातील एक नवे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद असलेल्या एका आरोपीला मध्यप्रदेश हायकोर्टाने मुलगा चांगल्या घरातील असल्याची टिप्पणी करत जामीन मंजूर केला. तसेच कोर्टाने त्याला दोन महिने भोपाळच्या रुग्णालयात सेवा करण्याची शिक्षाही सुनावली.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मध्यप्रदेशातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या या आरोपी तरुणावर अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे, तिला अश्लिल व्हिडिओ कॉल करणे तसेच वारंवार त्रास दिल्याचे गंभीर आरोप लावण्यात आले होते. ४ एप्रिल रोजी त्याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

या सुनवाणीदरम्यान कोर्टाने मुलाच्या घरची पार्श्वभूमी विचारात घेता त्याला एक संधी मिळावी, अशी महत्वपूर्ण टिप्पणी केली. या सुनावणीत न्यायमूर्ती आनंद पाठक यांनी पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीवर लावलेले आरोप खुपच गंभीर स्वरुपाचे आहेत. बीबीएच्या विद्यार्थ्याकडून अशी अपेक्षा नाही. मात्र तो चांगल्या कुटुंबातील आहे, त्याला एक सुधारण्याची संधी द्यायला हवी, असे नमुद केले आहे.

तसेच आरोपी विद्यार्थ्याला भोपाळ जिल्हा रुग्णालयात दर शनिवार आणि रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत फक्त डॉक्टर आणि कंपाउंडर्सना मदत करण्यास सांगितले आहे. मात्र, त्यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये रुग्णाला औषधे, इंजेक्शन आदी न देणे, त्याला खासगी वॉर्डात जाऊ न देणे आदी बाबींचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड|VIDEO

Maharashtra Live News Update: बी टी कवडे रस्त्यावर पुन्हा कोयत्याने गाड्या फोडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

Maharashtra Politics: तेव्हा मूग गिळून का बसले होते? खासदार नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल|VIDEO

Pune : पुण्यात बिबट्याचा धुमाकूळ; १३ वर्षीय मुलाचा जीवघेणा हल्ल्यात मृत्यू, ग्रामस्थांनी वनविभागाचं कार्यालय पेटवलं

India W vs South Africa W Final: रिप्लेसमेंट म्हणून आली, फायनलमध्ये चमकली, 'लेडी सेहवाग'ची अंतिम सामन्यात धुव्वाधार बॅटिंग

SCROLL FOR NEXT