Madhya Pradesh High Court declares Dhar Bhojshala a temple saam tv
देश विदेश

'मशीद नाही तर मंदिरच'; धार भोजशाळेच्या विवादावर उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

High Court Verdict on Bhojshala Dispute : मध्य प्रदेशातील उच्च न्यायालयाने धार येथील ऐतिहासिक भोजशाळा वादावर एक महत्त्वपूर्ण निकाल दिला.न्यायालयाने धार भोजशाळेला मंदिर म्हणून मान्यता दिली आहे.

Bharat Jadhav

  • धार भोजशाळा मंदिर असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय

  • एएसआय अहवालाच्या आधारे भोजशाळा मंदिर घोषित

  • भोजशाळा वादात हिंदू पक्षाला मोठा दिलासा

मध्य प्रदेशातील उच्च न्यायालयाने धार येथील ऐतिहासिक भोजशाळा वादावर एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने धार भोजशाळेला मंदिर म्हणून मान्यता दिली आहे. या निर्णयापूर्वी धारमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने धार भोजशाळेला मंदिर म्हणून मान्यता देत हिंदू पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे.

या निर्णयापूर्वी धारमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अहवालावरून उच्च न्यायालयाने धार भोजशाळेला मंदिर संकुल म्हणून घोषित केले आहे. दरम्यान हायकोर्टाच्या या निर्णयामुळे आता धार भोजशाळा मशीद नसून मंदिर असणार असल्याचं मान्य केलंय. दरम्यान मुस्लीम पक्ष आता या निर्णयाविरुद्धात सु्प्रीम कोर्टात जाणार की नाही हे अजून स्पष्ट झालं नाहीये.

कोर्टाने निकाल देताना ऐतिहासिक आणि पुरातत्त्व प्रमाणाचेा हवाला दिला. पुरातत्व एक विज्ञान आहे आणि न्यायालय वैज्ञानिक निष्कर्षांकडे दूर्लक्ष करू शकत नाही. न्यायालयाने हे स्पष्ट केलं की, अशा प्राचीन स्मारके आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन सुनिश्चित करणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे. त्यामुळे, संपूर्ण संकुलाचे प्रशासन आणि व्यवस्थापन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) अखत्यारीतच ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत.

उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा (ASI) २००३ चा एक आदेशही रद्द केला. त्यात हिंदूंच्या पूजेवर बंदी घालण्यात आली होती आणि मुस्लिमांना प्रार्थना करण्याची परवानगी देण्यात आली होती. न्यायालयाने म्हटले की, या आदेशामुळे हिंदू पक्षाचे हक्क मर्यादित झाले होते आणि म्हणूनच या निकालाच्या अनुषंगाने तो रद्द करण्यात आला. न्यायालयाने मुस्लीम पक्षाच्या बाजुनेही निकाल देताना त्यांच्यासाठी नमाज पठणासाठी धार जिल्ह्यात एका वेगळ्या ठिकाणी जमीन सरकारने उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिलेत.

केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) यांना निर्देश

या संकुलाचे संरक्षण, जतन आणि संस्कृत शिक्षणासंदर्भात निर्णय लवकरात लवकर घ्यावेत, असे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) यांना दिलेत. यात्रेकरू आणि स्थानिक लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रशासकीय आणि सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करणे ही राज्याची जबाबदारी आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही बाजूंकडून बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या दाव्यांच्या आणि ऐतिहासिक युक्तिवादांच्या पार्श्वभूमीवर, न्यायालयाचा हा निर्णय हिंदू पक्षासाठी एक मोठा विजय मानला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT