Madhya Pradesh Crime News SAAM TV
देश विदेश

Wife Killed Husband : नवऱ्याला दारू पाजली, मासे जेवू घातले; त्यानंतर बायकोने केलं भयंकर कृत्य, परिसरात खळबळ

madhya pradesh gwalior : मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये एका महिलेने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने प्रियकराच्या प्रेमासाठी पतीची हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : अंजलीने नवऱ्याला संपवायची पूर्ण तयारी केली होती. तिने नवऱ्याला दारू पाजली. त्यानंतर त्याला मासे जेवू घातले. जेवण झाल्यावर पत्नीने नवऱ्याचा गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रियकरासाठी अंजलीने नवऱ्याची हत्या केली. ग्वालियरमधील घटनेने परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मध्य प्रदेशच्या ग्वालियरमधून खळजनक घटना समोर आली आहे. ग्वालियरमधील गिरवाई येथे राहणाऱ्या लोकेंद्र कुशवाहा यांचा घरात मृतदेह आढळला. लोकेंद्र यांचे वडील एका खोलीत गेले. त्यावेळी घरात त्यांची सून नव्हती. तर मुलाला मृत अवस्थेत पाहून वडिलांनी पोलिसांना सूचना दिल्या.

लोकेंद्र यांना मृतअवस्थेत पाहून कुटुंबीयांनी त्यांच्या अंत्यविधीची तयारी केली. लोकेंद्र यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक आणि मित्र जमले. त्यानंतर लोकेंद्र यांच्या नातेवाईकांना मृतदेहाच्या गळ्यावर जखमा दिसल्या. त्यामुळे अंत्यविधीसाठी जमा असलेल्या लोकांना संशय आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना सूचना दिली. यामुळे पोलिसांनी तातडीने मृतदेह रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोस्टमार्टमध्ये लोकेंद्र यांचा गळा दाबून हत्या झाल्याचे उघड झालं.

पतीच्या मृत्यूनंतर पत्नी घरातून गायब

लोकेंद्र यांचा मृत्यू होण्याआधी काही वेळ आधी त्यांची पत्नी अंजली कुशवाहा आणि तिचा मावस भाऊ घरात होता. जेव्हा लोकेंद्र यांचा मृतदेह सापडला, त्यावेळी दोघेही घरात नव्हते. त्यामुळे पोलिसांना लोकेंद्र यांच्या पत्नीवर संशय आला. पोलिसांनी लोकेंद्र यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलीस चौकशीत हत्या केल्याची कबुली दिली.

बायकोने रचला पतीच्या हत्येचा डाव

अंजलीने सांगितलं की, 'लोकेंद्र यांचा मित्र गौरवसोबत प्रेमसंबंध होते. दोघांच्या प्रेमाची कुणकुण लोकेंद्र यांना कळाली. त्यानंतर गौरव यांना घरी येण्यास मज्जाव केला होता. अंजली गौरवच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्यामुळे अंजलीने पतीच्या हत्येचा डाव रचला. प्रेमी गौरववर हत्येचा आरोप येऊ नये, यासाठी अंजलीने १५ दिवस आधी गौरवला नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी पाठवलं होतं.

नवऱ्याला पाजली दारू अन्

अंजलीने १८ सप्टेंबरला मावस भावाला घरी बोलावलं. त्यानंतर अंजलीने पती लोकेंद्र यांना दारू पाजली. दारू पाजल्यानंतर मासे जेवू घातले. लोकेंद्र हे नशेत होते. त्यावेळी अंजलीच्या मावस भावाने लोकेंद्र यांचे हात पकडले. त्यानंतर अंजली लोकेंद्र यांच्या छातीवर बसून त्यांचा गळा दाबून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अंजली, मावस भाऊ बेटू आणि अंजलीचा प्रियकर गौरवला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT