Madhya Pradesh Election Yandex
देश विदेश

Madhya Pradesh Election: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' चार जिल्ह्यांत फेरमतदान होणार

Madhya Pradesh Lok Sabha 2024: मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ४ ठिकाणी पुन्हा मतदान होणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून मतदानाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप साम टीव्ही, मध्य प्रदेश

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ४ ठिकाणी पुन्हा मतदान होणार (Madhya Pradesh Lok Sabha 2024) आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून मतदानाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बैतूलमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी पार पडले होते. तेव्हा तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर साहित्य घेऊन जाताना ७ मे रोजी बसला आग लागली होती होती.

७ मे रोजी बसला लागलेल्या आगीमुळे बसमधील काही ईव्हीएम मशिन जळाले होते. त्यामुळे फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ४ ठिकाणी १० मे रोजी फेरमतदान (Madhya Pradesh Election) पार पडणार आहे. बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई येथील ४ मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होणार आहे.

बूथ २७५- राजापूर, बुथ २७६- दुदर रयत, बुथ २७९- कुंदा रयत आणि बुथ २८०- चिखलीमाळ या ठिकाणी फेरमतदान होणार आहे. या फेर मतदानासाठी (Revoting Madhya Pradesh) प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

मध्य प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत बैतूलच्या चार लोकसभा जागांवर पुन्हा मतदान (Lok Sabha 2024) होणार आहे. ७ मेच्या रात्री बैतूलमध्ये मतदान कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली होती. या आगीत बससोबत काही ईव्हीएम मशीनही जळून खाक झाले होते आहेत. बैतूलच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिली होती. आता या प्रकरणी निवडणूक आयोगाने चार मतदान केंद्रांवर फेरमतदानाची अधिसूचना जारी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teacher Salary: दीड लाख शिक्षकांवर टांगती तलवार; सोलापूरच्या ३ हजार शिक्षकांचा पगार थांबणार! काय आहे कारण ?

Mumbai Monorail : मोठी बातमी! येत्या शनिवारपासून मोनोरेल ट्रेनसेवा बंद राहणार, कारण?

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra Live News Update: अमरावती-मुंबई-अमरावती विमानसेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल

Fact-Check: महिलांचं STतील हाफ तिकीट बंद? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT