Sakshi Sunil Jadhav
गरमा गरम ब्रेड पकोडे किंवा पॅटीस हा नाश्ता सगळ्यांनाच आवडतो. मात्र तो जास्त तेलकट असल्याने अनेक जण तो खाणं टाळतात. पण आता तेलाचा एकही थेंब न टाकता, कमी कॅलरीत आणि हॉटेलसारखा चवदार ब्रेड पकोडा घरीच तयार करता येऊ शकतो.
साधारण ब्रेड पकोडा खूप तेल शोषून घेतो, त्यामुळे तो पचायला जड ठरतो आणि वजन वाढीचं कारण बनतो. म्हणून लोक खाणं टाळतात.
ब्रेड स्लाईस, उकडलेले बटाटे, आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, बेसन, आमचूर पावडर, कोथिंबीर, पुदिना, मीठ आणि गरम मसाला इ. bread pakoda
उकडलेले बटाटे मॅश करून त्यात मसाले, कोथिंबीर, पुदिना आणि चवीनुसार मीठ घालून सारण तयार करा.
बेसनात लाल तिखट, मीठ आणि थोडंसं पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा.
एका ब्रेड स्लाईसवर बटाट्याचं सारण ठेवा आणि दुसरी स्लाईस ठेवून सँडविच तयार करा. हे सँडविच बेसनात बुडवा.
तेल न वापरता नॉनस्टिक पॅनवर दोन्ही बाजूंनी ब्रेड स्लाईस भाजून घ्या. हवं असल्यास थोडंसं साजूक तूप किंवा बटर लावू शकता.
झाकण ठेवून पकोडा थोडा वेळ वाफवून घेतल्यास तो आतून मऊ आणि चवदार बनतो. हा ब्रेड पकोडा चविष्ट तर आहेच, पण पोटासाठी हलका आणि आरोग्यासाठीही उत्तम पर्याय आहे.