Ujjain women Crime News Saam TV
देश विदेश

Crime News : संतापजनक! विवाहितेला दारू पाजली, फुटपाथवरच बलात्कार केला; लोकांनी VIDEO बनवले अन् व्हायरल केले

Satish Daud

मागील काही महिन्यांपासून देशात महिलावरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीसोबत घडलेल्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून टाकलंय. दुसरीकडे बदलापूर येथील शाळेतील चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारामुळे संतापाची लाट उसळली आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना तातडीने फासावर लटवण्याचा कायदा करा अशी मागणी होत आहे. अशातच बलात्काराची आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे.

फुटपाथवर राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेवर दिवसाढवळ्या लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. ही संताजपनक घटना मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा आरोपी पीडित महिलेवर बलात्कार करत होता. तेव्हा काही लोक या प्रकाराचे व्हिडीओ बनवत होते. यातील काहींनी हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील केले.

हा संतापजनक प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. लोकेश असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केलं असता कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनं उज्जैन शहरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला तातडीने फासावर लटकवा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेवर लैंगिक अत्याचाराची ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोयला फाटक परिसरात घडली. शहरातील एका पेट्रोल पंपाजवळील फूटपाथवर पीडित 45 वर्षीय पीडित आपल्या कुटुंबासहित राहते. तिच्या परिवारातील लोक कामानिमित्त बाहेर गेले असता, लोकेश नराधमाने तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला.

आरोपीने आधी पीडितेला दारू पाजली. त्यानंतर तिच्यावर दिवसाढवळ्या बलात्कार केला. संतापजनक बाब म्हणजे जेव्हा हा नराधम महिलेच्या शरीराचे लचके तोडत होता. तेव्हा आजूबाजूचे लोक महिलेची मदत करण्याऐवजी मोबाइलवर व्हिडीओ बनवण्यात व्यस्त होते. काहींनी बलात्काराच्या लाईव्ह घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले.

पोलिसांपर्यंत हे व्हिडीओ पोहचताच त्यांनी तातडीने कारवाई करत आरोपीची ओळख पटवली. आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. बलात्काराचे व्हिडीओ मोबाइलमध्ये शूट करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या आरोपींचा देखील पोलीस शोध घेत आहेत. असा व्हिडीओ कुणालाही दिसल्यास तो तातडीने डिलिट करावा, कुणालाही फॉरवर्ड करू नये, अनथा कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT