STUDENT SUICIDE IN GWALIOR DUE TO EXAM STRESS SHOCKING INCIDENT Saam Tv
देश विदेश

Shocking : परीक्षेत कमी गुण मिळाले, ११ वीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल; वडिलांची बंदूक घेतली अन्...

Madhya Pradesh Sucide News : ग्वाल्हेरमध्ये अकरावीतील विद्यार्थिनीने कमी गुणांमुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील वाढत्या शैक्षणिक तणावाबाबत चिंता व्यक्त होत आहे.

Alisha Khedekar

  • ग्वाल्हेरमध्ये अकरावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

  • कमी गुणांमुळे नैराश्य

  • घटनास्थळी सुसाईड नोट सापडली

  • शैक्षणिक तणावाबाबत पुन्हा चिंता व्यक्त

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता अकरावीतील एका विद्यार्थिनीने परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्येतून बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृत मुलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बहोदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोसीपुरा भागात, गिरराज जी मंदिराजवळ घडली. मृत विद्यार्थिनीचे नाव ट्विंकल अहिरवार अशी असून ती इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP) मध्ये कार्यरत असलेल्या जवानाची मुलगी होती. सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घरात गोळीबाराचा आवाज आला. त्या वेळी घरातील सर्व सदस्य झोपेत होते. आवाज ऐकताच कुटुंबीयांनी धावत जाऊन पाहिले असता, तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता.

दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या जवळच पिस्तूल पडलेले होते. कुटुंबीयांनी तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयात नेले. त्यानंतर तिला जयआरोग्य रुग्णालय येथे हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. इंग्रजीत लिहिलेल्या या चिठ्ठीत, “मी माझ्या कुटुंबाचा अभिमान वाढवू शकले नाही, म्हणून हे पाऊल उचलत आहे,” असे नमूद करण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच तिचा इयत्ता अकरावीचा निकाल लागला होता आणि तिला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले होते. याच तणावामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून सुसाईड नोट आणि पिस्तूल जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, विद्यार्थ्यांवरील वाढत्या शैक्षणिक दबावाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update : पवारांची राष्ट्रवादी कायम एकत्रच राहणार - अमोल कोल्हे

Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा, गरज असल्यासच घराबाहेर पडा

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळं सोनं ३७,००० रुपयांनी महागलं; चांदीचे दर काय? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

आलं, तुळस आणि मिरीचा काढा; पावसाळ्यात आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर| Ayurvedic Kadha Recipe

Shocking : धक्कादायक! प्रेमसंबंधांच्या संशयातून बेदम मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू; भाजप नगरसेविकेचं ऑफिस फोडलं

SCROLL FOR NEXT