Madhya Pradesh  Saam Tv
देश विदेश

Shocking : '५२ वेळा म्हणाला Sorry…’ पण शिक्षकाने माफ केलेच नाही, विद्यार्थ्याने तिसऱ्या मजल्यावरून टाकली उडी, नेमकं झालं काय होतं?

Madhya Pradesh School Student : मध्य प्रदेशात राष्ट्रीय स्तरावरील स्केटर असलेल्या ८वीच्या विद्यार्थ्याने शाळेतून काढून टाकण्याची धमकी मिळाल्यानंतर शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. विद्यार्थी सध्या स्थिर असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • ८वीच्या विद्यार्थ्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न

  • शिक्षकांच्या कठोर कारवाईची भीती आणि मानसिक तणाव कारणीभूत

  • सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद

  • पीडित मुलगा राष्ट्रीय स्तरावरील स्केटर

मध्य प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ८ विच्या विद्यार्थ्याने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचं म्हटलं जात आहे. धक्कादायक म्हणजे शिक्षकांनी शाळेतून काढू अशी धमकी दिल्याने त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. या घटनेचा व्हिडिओ शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. हा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरचा स्केटर असल्याचं वृत्त आहे.

सीसीटीव्ही फुटेजनुसार, एक विद्यार्थी शाळेतील मुख्याध्यापिकांच्या कॅबिनमध्ये जाताना दिसत आहे. हा मुलगा ५ ते १० मिनिटानंतर बाहेर आला. बाहेर आल्यानंतर रडत रडत शाळेतील वर्गातील आवारात येऊन इकडे तिकडे पाहून खाली उडी मारली. त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर शाळेत एकच गोंधळ उडाला. पीडित विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शाळा प्रशासनाने काय सांगितलं?

शाळा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी या विद्यार्थ्याने आपला फोन शाळेत आणला होता आणि वर्गातील व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, जो त्याने नंतर सोशल मीडियावर अपलोड केला. शाळा प्रशासनाला हा व्हिडिओ सापडला आणि शाळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्या पालकांना शुक्रवारी शाळेत बोलावून घेण्यात आले. याच वेळेस या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्या आत्महत्येच्या वेळेस त्याचे वडील शाळेच्या परिसरात उपस्थित होते.

विद्यार्थी काय म्हणाला?

विद्यार्थ्याच्या जबाबानुसार, त्याने केल्याला कृती नंतर शिक्षकांनी त्याला शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. याशिवाय त्याने शिक्षकांना ५२ वेळा सॉरी बोलूनही त्यांनी त्याला माफ केले नाही. त्या धमकीला घाबरून त्याने आत्महत्येच पाऊल उचललं. दरम्यान या दुर्घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी काय सांगितलं?

विद्यार्थ्याच्या वडिलांनी म्हटले आहे की, "मला माझ्या मुलाला भेटण्यासाठी बोलावण्यात आले होते. मी शाळेत पोहोचलो तेव्हा मला कळले की तो पडला आहे. तो दोनदा राष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाला आहे. मला शाळेकडून फोन आला, पण नंतर शाळेतून दुसरा फोन आला आणि मला थेट रुग्णालयात येण्यास सांगितले," असे विद्यार्थ्याचे वडील प्रीतम कटारा म्हणाले.

शाळेतील शिक्षक काय म्हणाले?

एसडीएम आर्ची हरित यांनी म्हटले आहे की, मुलाने शाळेत फोन आणला होता, जो शाळेच्या धोरणाचे उल्लंघन आहे, परंतु परिस्थिती अनपेक्षितपणे वाढली यावर जोर दिला. "मुलगा आठवीत आहे. तो त्याचा फोन घेऊन आला होता. तो पळून गेला आणि उडी मारली. त्याची प्रकृती स्थिर आहे. चौकशी केली जाईल. शाळेत मोबाईल फोनला परवानगी नाही, अगदी शिक्षकांचे फोनही जप्त केले जातात. तो एक स्केटर आहे ज्याचे राष्ट्रीय स्तरावर खूप चांगले स्थान आहे," असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: नाशिकचा तिढा सुटला, पण पुण्यात महायुतीच्या जागावाटपाचं घोडं अडलं, कसा आहे जागावाटपाचा फॉर्म्युला?

घायल हूं इसलिए घातक हूं! 'धुरंधर' विराट कोहलीनं ठोकलं तुफानी शतक, विजय हजारे ट्रॉफीत दणका उडवला

Weight Loss Diet plan: न्यू एयरपासून वजन कमी करण्यासाठी डाईट करणार? मग 'हा' घ्या तुमचा डेली प्लॉन

Maharashtra Live News Update: नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक भूसंपादनाचा मार्ग मोकळा

Jio Recharge: jio युजर्ससाठी खुशखबर! 84 दिवसांचा हा प्लान फक्त ६०० रुपयात, वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT