मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा अचानक राजीनामा
भाजप प्रवेशाच्या चर्चांना आणखी वेग
केडीएमसी निवडणुकांपूर्वी मनसेसाठी मोठा राजकीय धक्का
मनसेची चिंता वाढली
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
केडीएमसी निवडणुका जवळ येत असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच आज मनसेला मोठा धक्का बसला आहे. कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांनी पुढील राजकीय प्रवासाबाबत उत्सुकता निर्माण केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भोईर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोरात होत्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भूमीपूजन कार्यक्रमात ते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोबत उपस्थित असल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांच्या हालचालींना अधिक वेग आला.
माध्यमांनी याविषयी विचारणा केल्यावर प्रकाश भोईर यांनी सांगितले होते की, कार्यकर्त्यांनी मला आजवर मोठे केले आहे. त्यांच्या आशीर्वादानेच मी निवडून आलो. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील वाटचाल ठरवणार आहे.
आज त्यांनी अखेर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर केला असून आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे. भाजप मध्ये हालचाली पाहता भोईर लवकरच भगवा धारण करण्याची शक्यता राजकीय सूत्रांनी वर्तवली असली तरी याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
आगामी केडीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये निर्माण झालेला हा मोठा भूकंप नक्कीच चर्चेचा विषय ठरणार आहे. प्रकाश भोईर व त्यांच्या पत्नी सरोज भोईर हे दोघेही माजी नगरसेवक होते. त्याच त्याच बरोबर प्रभागात त्यांची छाप असून मोठा जनसंपर्क असल्याने आगामी निवडणुकीत मनसे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.