Mallikarjun Kharge On PM Narendra Modi Saam Tv
देश विदेश

Political News: 'ज्या घरात मोदींचा फोटो पोहोचला, ते घर गरीब झाले', मल्लिकार्जुन खरगे यांची PM मोदींवर टीका; VIDEO

Mallikarjun Kharge On PM Narendra Modi: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Satish Kengar

Mallikarjun Kharge On PM Narendra Modi:

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते बुधवारी म्हणाले की, ''तुम्ही टीव्ही चालू करताच तुम्हाला त्यावर मोदींचा फोटो दिसतो. ज्या घरात मोदींचा फोटो टीव्हीवर दिसतो ते घर गरिबीत जाते. पंतप्रधान मोदींना विकास नको आहे. पंतप्रधान मोदींना गरिबांचे कल्याण नको आहे. त्यांना आमच्या मुलांचे शिक्षण नको आहे. कारण गरीब मुले शिक्षण घेऊन पुढे आली तर अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे मोदी गरिबांच्या विरोधात काठी उगारतात. काँग्रेस पक्ष पुढे सरकला की ते चिरडण्याचे काम करतात.''

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ''आज देशात ४५ वर्षात सर्वाधिक बेरोजगारी आहे. देशात दररोज महागाई वाढली आहे. हे सर्व मोदींच्या काळात घडले आहे. देशातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी संपू नये, असे पंतप्रधान मोदींना वाटत आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले, ''श्रीमंतांनी अधिक श्रीमंत व्हावे आणि गरीबांनी अधिक गरीब व्हावे, अशी मोदींची इच्छा आहे. मोदी म्हणाले होते, मी दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देईन, मी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकीन. मी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करीन, शेतकऱ्यांना एमएसपी देणार पण काहीही केले नाही.''   (Latest Marathi News)

मल्लिकार्जुन खरगे मध्य प्रदेशातील धार येथे भारत जोडो न्याय यात्रेअंतर्गत आयोजित जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यांनी भाजपवर शिवराज सिंह चौहान यांना बाजूला सारल्याचा आरोप केला. ते म्हणाले, भाजप नेते काँग्रेसबद्दल चुकीचे बोलतात. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह चौहान म्हणाले की, खरगे आणि राहुल गांधी काँग्रेसला नष्ट करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. भाजपने शिवराज सिंह चौहान यांना सत्तेवरून का हटवले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थित लोकांना संबोधित करताना म्हणाले आहे की, काही वेळापूर्वी मी एका व्हिडिओमध्ये पाहिले होते की भाजप नेता एका आदिवासी तरुणावर लघवी करत होता. हा कसला विचार आहे? ही भाजपची विचारधारा आहे. हे फक्त आदिवासींसोबतच घडत नाहीये… दलित, आदिवासी आणि गरिबांच्या बाबतीत होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT