Madhya Pradesh Assembly Election 2023 Results Saam Digital
देश विदेश

Madhya Pradesh Assembly Election 2023 Results: सिंधियांनी साथ सोडली, ग्वाल्हेरचा बालेकिल्ला कमलनाथांच्या हातून निसटला; सर्वच जागांवर काँग्रेसची पिछाडी

Sandeep Gawade

Madhya Pradesh Assembly Election 2023 Results

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. बहुमताच्या आकड्यापेक्षा अधिक जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. काँग्रेस आणि कमलनाथ यांना मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे चित्र आहे. सिंधियांनी साथ सोडल्यानंतर ग्वाल्हेरचा बालेकिल्ला कमलनाथांच्या हातून निसटला आहे. ग्वाल्हेर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सहा जागांवर भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जात असून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची जादू कायम असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला अद्याप ग्वाल्हेर जिल्ह्यात खातेही उघडता आलेले नाही.

विधानसभेच्या २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसने ग्वाल्हेर जिल्ह्यातील सहापैकी पाच जागा जिंकून इतिहास रचला होता. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागत होते. याच मतदारसंघातून भाजपचे एकमेव आमदार भरत सिंह विजयी झाले होते. ज्योतिरादित्य सिंधिया यांचा हा मोठा विजय मानला जात होता. त्यामुळे सिंधिया यांनी जेव्हा काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा जिल्ह्यातील पाच पैकी तीन आमदार त्यांच्यासोबत गेले होते. यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तिनपैकी दोन जागा जिंकल्या होत्या. सिंधिया घराण्याची जादू आता ग्वाल्हेर आणि चंबळमधून गायब झाल्याचे बोलले जात होते. मात्र आजच्या निकालातून सिंधियांचा दबदबा कायम असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस सुरुवातीपासूनच सहाही जागांवर पिछाडीवर आहे. हक्काच्या चार जागा काँग्रेस गमावताना दिसत आहे तर भाजप या चार जागांसह त्यांच्या हक्काच्या दोन जागांवरही आघाडीवर आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्वाल्हेर जिल्ह्यातील भितरवार मतदारसंघाची जागा गेल्या दोन दशकांपासून सर्वात कमकुमवत मानली जात होती. या मतदारसंघातून काँग्रेसचे लखन सिंग सलग पाचवेळा निवडून आले आहेत. यावेळी सिंधिया यांनी या मतदारसंघातून त्यांचे कट्टर समर्थक मोहन सिंह राठोड यांना तिकीट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. राठोड सर्वात कमकुवत उमेदवार मानले जात होते. मात्र त्यांनी केवळ चारच फेऱ्यांमध्ये निर्णायक आघाडी घेतली. ग्वाल्हेर चंबळमधील उर्वरित जागांवरही अशीच स्थिती आहे. दरम्यान २०१८ मध्ये भिंड जिल्ह्यात काँग्रेसला एक जागा मिळाली होती. यावेळी मात्र वेगळी स्थिती पहायला मिळत आहे. अटेरमध्ये हेमंत कटारे यांनी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विरोधीपक्ष नेते डॉ. गोविंद सिंगही विजयाच्या जवळपास आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT