Madhya Pradesh Electricity Bill Saam Tv
देश विदेश

अबब ! ३४ अब्ज रुपये आलं लाईट बिल; सुनेचा वाढला बीपी, सासरे रुग्णालयात दाखल

वीज बिल अचानक वाढून येण्याची आपण प्रकरणे पाहिली आहेत, पण मध्य प्रदेशात अब्जात वीज बिल आले आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: वीज (Power) बिल खूप वाढून येते. २०० ते ५०० रुपये येणारे वीज बिल काहीवेळा हजारांत येते. पण आता एक वीज बिल अब्जात आलेले समोर आले आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमध्ये हा प्रकार समोर आला. ग्वाल्हेरमध्ये वीज विभागाने एका कुटुंबाला कोट्यवधी रुपयांचे बिल दिल्याने सासरे आणि सुनेला मोठा धक्का बसला. या वीज बिलातील आकडा पाहून सुनेचा बीपी वाढला आहे, तर सासऱ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

हे धक्कादायक प्रकरण मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या शिव बिहार कॉलनी येथील आहे. येथे राहणारे संजीव कनकणे हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांची पत्नी प्रियांका गुप्ता गृहिणी आहे. त्यांना जुलै महिन्यातील वीज बिल आले. तेव्हा ते बिल पाहून कुटुंबातील सर्व सदस्यांचा घाम फुटला. त्यांचे जुलै महिन्यातील वीज (Power) बिल ३४ अब्ज रुपयांपेक्षा जास्त आले, ते पाहून त्यांची पत्नी प्रियंका यांचा बीपी वाढला आणि त्यांची प्रकृती अचानक बिघडली. तर त्यांचे वडील राजेंद्र प्रसाद गुप्ता यांना अगोदरच हृदयाचा त्रास आहे. त्यांना आलेले बिल पाहून त्यांचा रक्तदाब वाढला. यानंतर वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

कोट्यवधी रुपयांचे हे बिल बरोबर करुन मिळावे, यासाठी संजीव यांना वीज (Power) विभागाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागल्या. यानंतर वीज कंपनीने त्यांच्या बिलात दुरुस्ती केली. आता संजीव यांचे वीज बिल फक्त १३०० रुपये आले आहे.

'ही आमच्या कर्मचाऱ्याच्या हातून चूक झाली होती, ती आता सुधारण्यात आली आहे. ही बाब गांभीर्याने घेत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वीज कंपनीचे महाव्यवस्थापक यांनी दिली.

वीज कंपनीच्या अशा उणिवामागे तात्पुरत्या जोडण्या कायम न करणे हेच कारण असल्याचे अनेक वीज ग्राहकांचे म्हणणे आहे. या कारणास्तव घर खरेदी करून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी त्यांना व्यावसायिक दरानेच वीजबिल भरावे लागत आहे. एकूणच मध्य प्रदेशातील वीज कंपनीच्या मनमानीमुळे जनता प्रचंड नाराज आहे. कुठे वीज कपातीचा त्रास लोकांना भेडसावत आहे, तर कुठे वाढीव वीजबिलाचा (Power) त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT