Manasvi Choudhary
भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. यामध्ये फॅट्स, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्वे आणि खनिजे ही पौष्टिक गुणधर्म असतात.
अनेकांना प्रश्न पडतो की, भोपळ्याच्या बिया कच्चा की भाजून खाव्यात? दोन्हीचे शरीरासाठी फायदेशीर आहेत का? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीराला कोणता फायदा होतो?
भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करते.
तुम्हाला निद्रानाश किंवा झोप न लागण्याचा त्रास असेल, तर ट्रिप्टोफॅनयुक्त भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने गाढ झोप लागण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बियामध्ये व्हिटॅमिन ई आणि बिटा कॅरोटीनसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी भोपळ्याच्या बिया अत्यंत गुणकारी आहेत
कच्च्या बियांमध्ये नैसर्गिक एन्झाईम्स आणि सर्व पोषक घटक जसेच्या तसे टिकून असतात. पचनासाठी फायदेशीर आहेत.
जर तुम्हाला कुरकुरीत खायला आवडत असेल, तर तुम्ही त्या हलक्या कोरड्या भाजून घ्या. जास्त तेल वा तूप न वापरता भाजा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.