Monsoon Session : 'आप'चे खासदार संजय सिंह यांना राज्यसभेतून केले निलंबित

लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे.
MP Sanjay Singh
MP Sanjay SinghSaam Tv

नवी दिल्ली: लोकसभा आणि राज्यसभेत (Rajya Sabha) विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. जीएसटी आणि महागाईच्या मुद्द्यावरून मंगळवारी दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला. राज्यसभेत मंगळवारी विरोधी पक्षनेत्यांनी तृणमूल काँग्रेसचे सात आणि डीएमके च्या सहा सदस्यांसह एकूण १९ सदस्यांविरोधात शुक्रवारपर्यंत निलंबन करण्यास तीव्र विरोध केला. सार्वजनिक समस्या मांडण्यापासून रोखण्यासाठी सरकारचे हे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज (बुधवारी) आपचे खासदार संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. (Monsoon Session Latest News)

MP Sanjay Singh
सावधान! राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून अलर्ट

घोषणाबाजी, कागद फाडणे आणि खुर्चीकडे फेकल्याप्रकरणी आपचे खासदार संजय सिंह यांना या आठवड्यासाठी राज्यसभेतून (Rajya Sabha) निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहातील सदस्यांना कडक इशारा दिला आहे. मला नियम पाळावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. संसदीय लोकशाही मजबूत करण्यासाठी चर्चा करा, असंही बिर्ला म्हणाले.(Monsoon Session Latest News)

MP Sanjay Singh
उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीला तुरुंगात मारहाण; नुपूर शर्मा वक्तव्याचा वाद तुरुंगापर्यंत

लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर सभापती ओम बिर्ला संतापले. सभापती ओम बिर्ला यांनी हा गोंधळ अशोभनीय असल्याचे म्हटले आणि ही परिस्थिती लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही. सदनाचे नियम व कार्यपद्धती सभासदांनी बनवली आहे. सदस्यांनी फलक आणू नयेत, असे नियमात लिहिले आहे. तुम्ही तुमचे स्वतः नियम पाळत नाही, असंही ते म्हणाले.(Monsoon Session Latest News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com