Bhopal News Update Saam Tv
देश विदेश

धक्कादायक! स्कूल बसमध्ये नर्सरीच्या मुलीसोबत ड्रायव्हरचं घृणास्पद कृत्य; महिला अटेंडेंटच्या डोळ्यांसमोरच सगळं घडलं

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये स्कूल बसमध्ये तीन वर्षीय मुलीवर ड्रायव्हरने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

साम ब्युरो

Bhopal News | भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. खासगी शाळेच्या स्कूल बसचालकाने महिला अटेंडेंटच्या समोरच तीन वर्षीय मुलीवर बलात्कार केला. लज्जास्पद बाब म्हणजे या घटनेनंतर अटेंडेंट आणि चालकाने संगनमताने घटना उघड होऊ नये यासाठी पीडित मुलीचे कपडे बदलले, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत समजल्यानंतर पीडितेच्या पालकांना धक्का बसला. त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून ड्रायव्हरसह दोघांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या (Girl) पालकांनी सोमवारी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. ही घटना दुपारी घडली होती. पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी परतत होती. तिला शेवटच्या स्टॉपवर उतरायचे होते. स्कूल बसमध्ये ती महिला अटेंडेंट आणि चालक यांच्याव्यतिरिक्त एकटीच होती. समुपदेशनावेळी मुलीने सर्व हकिकत सांगितली. बसचालकाने तिच्यावर अतिप्रसंग (Rape) केला. त्यानंतर तिच्या बॅगमधील स्पेअर कपडेही बदलले. मुलगी घरी पोहोचल्यानंतर तिची अवस्था बघून कुटुंबीयांना संशय आला. त्यावेळी मुलीने पालकांना काहीच सांगितले नाही.

पीडित मुलीला त्याच दिवशी रात्री वेदना होऊ लागल्या. त्यावेळी तिच्या आईने तपासले असता मुलीच्या शरीरावर व्रण होते. त्यानंतर तिने मुलीला विचारणा केली. त्यावर मुलीने संपूर्ण हकिकत सांगितली. आईने याबाबत वडिलांनाही माहिती दिली. त्यानंतर सोमवारी मुलीला घेऊन पालक पोलीस (Police) ठाण्यात पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

पोलिसांनी सोमवारी शाळा सुरू झाल्यानंतर या घटनेचा तपास सुरू केला. त्यावेळी मुलीसमोर शाळेच्या बस वाहतूक व्यवस्थापनातील सर्व कर्मचाऱ्यांना आणण्यात आले. त्यावेळी बसचालक आणि महिला अटेंडेंटला पाहताच मुलीने त्यांना ओळखले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो अॅक्ट अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी वैद्यकीय अहवाल आणि आवश्यक पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT