Crime News in Madhya Pradesh saam tv
देश विदेश

Madhya Pradesh Crime : धक्कादायक! अ‍ॅम्ब्युलन्समध्ये मुलीवर सामूहिक अत्याचार; बहिणीसह दाजीनं घात केल्याचा आरोप

Madhya Pradesh crime news : मध्य प्रदेशात धावत्या रुग्णवाहिकेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडलीये. या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

मध्य प्रदेशच्या मऊगंज जिल्ह्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. लोकांना आपात्कालीन वेळेत मदत करणाऱ्या रुग्णवाहिकेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची झाल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशात २२ नोव्हेंबर रोजी रुग्णवाहिकेच्या चालकासहित चार जणांनी अल्पवयीवर मुलीवर अत्याचार केला. या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या गैरकृत्यात पीडित मुलीची बहीण आणि तिच्या दाजीचाही समावेश असल्याची माहिती हाती आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी तिची बहीण आणि तिच्या दाजीसोबत रुग्णवाहिकेतून जात होती. त्यांच्यासोबत कोणताही रुग्ण नव्हता. रुग्णवाहिकेत तिघांव्यतिरिक्त चालक आणि त्याचा सहकारी होता. अल्पवयीन मुलगी रुग्णवाहिकेच्या चालाकाला ओळखत होती.

रस्त्यात मुलीची बहीण आणि तिचा दाजी पाणी आणण्यासाठी रुग्णवाहिकेच्या बाहेर उतरला. याचदरम्यान, चालकाने रुग्णवाहिका सुरु करून वेगाने पुढे नेली. त्यानंतर धावत्या रुग्णवाहिकेत आळी पाळीने दोघांनी अत्याचार केला. अल्पयवीन मुलीने बहीण आणि तिच्या दाजीवरही आरोपींना सहकार्य केल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांनी पुढे सांगितलं की, 'अल्पवयीन मुलीला संपूर्ण रात्र बांधून ठेवलं. त्यानंतर सकाळी एका रस्त्याजवळ फेकलं. आयपीएस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पीडित मुलीने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. कुटुंबाची बदनामी आणि भीतीमुळे मुलीने हा प्रकार पोलिसांना सांगितला नाही. दोन दिवसांनी पीडित मुलगी आणि तिच्या आईने पोलिसांना कळवलं. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून चार जणांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी रुग्णावाहिका चालक वीरेंद्र आणि सहकारी केवटला बुधवारी अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलीची बहीण आणि दाजी फरार आहे. आयपीएस अधिकाऱ्यांनी म्हटलं की,पोलीस मुलीची बहीण आणि दाजीच्या शोधावर आहेत. सर्व आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT