Pune Crime: विद्येच्या माहेरघरात चाललयं काय? 'काळी जादू घालवतो' म्हणत महिलेला घातला १५ लाखांचा गंडा; दोघांवर गुन्हा दाखल

Pune Fraud News: एका ज्योतिषाने महिलेला तब्बल १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरातून समोर आला आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुशिक्षित पुण्यामध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Pune Crime: विद्येच्या माहेरघरात चाललयं काय? 'काळी जादू घालवतो' म्हणत महिलेला घातला १५ लाखांचा गंडा; दोघांवर गुन्हा दाखल
Pune Crime NewsSAAM TV

अक्षय बडवे, पुणे|ता. १४ मे २०२४

काळी जादू घालवतो म्हणत एका ज्योतिषाने महिलेला तब्बल १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरातून समोर आला आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुशिक्षित पुण्यामध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, २८ वर्षीय फिर्यादी तरुणीची उत्तर प्रदेशमधील कृष्णनारायण तिवारी नावाच्या एका ज्योतिष्याशी ओळख झाली होती. आपले पतीसोबत नेहमी भांडण होतंय, असे तिने ज्योतिषी तिवारी याला सांगितले होते. यावर तुमच्या घरावर कोणीतरी काळी जादू केली आहे, ती नष्ट करतो, त्यासाठी पुजा करावी लागेल, असे त्यांनी संबंधित महिलेला सांगितले.

तसेच एके दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालून तो त्या तरुणीच्या घरी गेला. पूजा झाल्यावर प्रसादात त्याने गुंगीचे औषध देऊन तरुणीचे अंतर्वस्त्रातील फोटो काढले. हे फोटो तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या इतरांना पाठवेल अशी धमकी देत त्याने वेळोवेळी पैशांची मागणी केली. धमकीला घाबरून त्या तरुणीने १५ लाख ३० हजार रुपये त्याला पाठवले.

Pune Crime: विद्येच्या माहेरघरात चाललयं काय? 'काळी जादू घालवतो' म्हणत महिलेला घातला १५ लाखांचा गंडा; दोघांवर गुन्हा दाखल
Kolhapur News: दुर्दैवी घटना! पैशासाठी सावकाराचा तगादा, जीवे मारण्याची धमकी, शेतकऱ्याने संपवले आयुष्य

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी उत्तर प्रदेशचा ज्योतिषी कृष्णनारायण तिवारी आणि अंतिम कृष्णनारायण तिवारी अशा २ जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Pune Crime: विद्येच्या माहेरघरात चाललयं काय? 'काळी जादू घालवतो' म्हणत महिलेला घातला १५ लाखांचा गंडा; दोघांवर गुन्हा दाखल
Delhi News: ईव्हीएम आणि VVPAT प्रकरणी 'सर्वोच्च' निकालाला आव्हान! सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल, काय निर्णय होणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com