Ghorpadi Crime : पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तिघांवर जीवघेणा हल्ला; घोरपडीत पहाटेच्या सुमाराची घटना

Pune Ghorpadi News : घोरपडीतील बी टी कवडे रोडवरील देवकी पॅलेस चौकातील स्वराज अमृततुल्य शेजारी गुरुवारी पहाटे एक वाजता सदरची घटना घडली आहे.
Ghorpadi Crime
Ghorpadi CrimeSaam tv
Published On

घोरपडी : बी टी कवडे रस्ता येथील देवकी पॅलेस चौकात पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने तिघांवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत एका तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घोरपडीतील बी टी कवडे रोडवरील देवकी पॅलेस चौकातील स्वराज अमृततुल्य शेजारी गुरुवारी पहाटे एक वाजता सदरची घटना घडली आहे. या घटनेत चोघेजण चौकात पहाटेपर्यंत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी चार- पाच जण आले. गप्पा मारत असताना यातून टोळक्याबरोबर त्यांचे शाब्दिक वाद व बाचाबाची झाली. यातून टोळक्याने हत्याराने वार केला. 

Ghorpadi Crime
Amravati News : नाफेड सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी फिरवली पाठ; आर्द्रता व निकषावर शेतकऱ्यांची नाराजी

टोळक्यातीन एका जनाने अमित परदेशी याच्या डोक्यात व हनुवटीवर वार करुन गंभीर जखमी केले. तर सोहेश अलमले (रा. मांजरी) याच्या कानाजवळ धारदार हत्याराने वार करुन जखमी केले. अजय पवार याच्या डोक्यात मानेवर, पाठीमध्ये, पोटावर, दोन्ही पायावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा (Crime news) प्रयत्न केला. 

Ghorpadi Crime
Tulja Bhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराचे होणार नूतनीकरण; पुरातन दगडावर नंबर टाकायला सुरवात, ५८ कोटी १२ लाखाचा निधीस मान्यता

तसेच फिर्यादीस हाताने व उलट्या कोयत्याने मारहाण केली. तेथील चारचाकी वाहनाच्या मागील काच फोडून नुकसान केले. मारहाण केल्यानंतर टोळके पळून गेले. दरम्यान (Police) मुंढवा पोलिसांनी महेश गजसिंह, स्वप्निल कोतवाल, करण नागटिळक सर्वजण (रा. टिळेकरनगर, कोंढवा) यासह आणखी एकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com