Madhabi Puri Buch Saam Digital
देश विदेश

Madhabi Puri Buch : हिंडेनबर्गच्या रडारवर आलेल्या सेबीच्या प्रमुख कोण आहेत? या संस्थेचं हे पद भूषवणाऱ्या आहेत पहिल्या भारतीय महिला

Who is Madhabi Puri Buch : हिंडेनबर्गने माधबी पुरी बुच यांच्यावर अदानी घोटाळ्याशी संबंधित ऑफशोअरमध्ये हिस्सेदारी असल्याचा आरोप केला. त्यानंतर अचानक प्रकाश झोतात आलेल्या माधबी पुरी बुच कोण आहेत? याची चर्चा देशभर रंगली आहे.

Sandeep Gawade

हिंडेनबर्गने अदानी समूहानंतर आता थेट बाजार नियंत्रक सेबीवर (इक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. सेबीच्या (SEBI)अध्यक्षा माधबी पुरी बुच देखील अदानी समूहाशी संबंधित असल्याचं हिंडनबर्ग अहवालात नमूद करण्यात आलं आहे, त्यामुळे भारतीय उद्योग क्षेत्रात खळबळ माजली आहे. माधबी पुरी बुच यांनी या आरोपांचं खडंण करत बदनामी करण्याचं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टनंतर अचानक प्रकाश झोतात आलेल्या माधबी बुच आहेत तरी कोण? अदानी समुहाशी त्यांचा संबध काय? याविषयी जाणून घेऊयात

माधबी पुरी बुच या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) विद्यमान अध्यक्षा आहेत. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. SEBI मध्ये रुजू होण्यापूर्वी ICICI बँक आणि ICICI सिक्युरिटीजमध्ये MD आणि CEO होत्या.बँकेच्या बोर्डावर कार्यकारी संचालक पदही भूषवलं आहे. फायनान्स क्षेत्रावर त्यांची मजबूत पकड आहे, मोठा अनुभवही आहे.

माधबी बुच यांनी 2 मार्च 2022 मध्ये य सेबीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. यापूर्वी त्या सेबीच्या पूर्णवेळ सदस्य होत्या आणि बाजार नियमन, गुंतवणूक व्यवस्थापन आणि आयटी संबंधित विभागांचे कामकाज पाहत होत्या.

माधबी यांनी शांघायच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेत सल्लागार आणि खासगी इक्विटी फर्म ग्रेटर पॅसिफिक कॅपिटलमध्ये सिंगापूर प्रमुख म्हणूनही काम पाहिलं आहे.

बुच यांनी IAM अहमदाबादमधून एमबीए आणि सेंट स्टीफन्स कॉलेज, नवी दिल्ली येथून गणित विषयातून पदवी घेतली आहे.

एप्रिल 2017 ते मार्च 2022 पर्यंत माधबी पुरी बुच सेबीच्या पूर्णवेळ सदस्य आणि अध्यक्ष होत्या. सिंगापूरमधील Agora Partners नावाच्या सल्लागार कंपनीत त्यांची 100 टक्के भागीदारी होती. 16 मार्च 2022 रोजी SEBI च्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती होण्याआधी दोन आठवड्यांपूर्वी, कंपनीतील त्यांचे शेअर्स त्यांचे पती धवल बुच यांच्या नावावर हस्तांतरित केले होते, असा धक्कादायक आरोप हिंडेनबर्गने केला आहे.

कोण आहेत धवल बुच?

धवल बुच SEBI च्या प्रमुख माधबी बुच यांचे पती आहेत. सध्या ते Blackstone आणि Alvarez & Marshall चे वरिष्ठ सल्लागार आहेत. गिल्डन मंडळावर त्यांनी बिगर कार्यकारी संचालकपदही भूषवलं आहे. आयआयटी दिल्लीतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी. टेक पदवी मिळवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

Maharashtra Exit Polls : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll : शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचा विजय? पाहा Exit Poll

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

SCROLL FOR NEXT