Hindenburg Research : अदानी घोटाळ्यातील 'ऑफशोअर'मध्ये सेबीच्या अध्यक्षांची हिस्सेदारी; हिंडनबर्गच्या नव्या रिपोर्टनं भारतीय उद्योग क्षेत्रात खळबळ

Hindenburg Report On SEBI Madhabi Puri Buch : हिंडेनबर्गने थेट बाजार नियंत्रक सेबीवर गंभीर आरोप केले आहेत. कथित अदानी घोटाळ्यात वापरल्या गेलेल्या ऑफशोअर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिस्सेदारी असल्याचा आरोप केला आहे.
Hindenburg Report On SEBI
Hindenburg Report On SEBISaam Digital
Published On

अदानी समूहाविरोधात जवळपास १८ महिन्यांपूर्वी हिंडेनबर्गने अनेक खुलासे करत मोठा धक्का दिला होता. मात्र यावेळी हिंडेनबर्गने थेट बाजार नियंत्रक सेबीवर गंभीर आरोप केले आहेत. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच देखील अदानी समूहाशी संबंधित असल्याचं हिंडनबर्ग अहवालात नमूद करण्यात आलं आहे, त्यामुळे भारतीय उद्योग क्षेत्रात खळबळ माजली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने यासंदर्भातील रिपोर्ट आपल्या अधिकृत साईटवर प्रसिद्ध केला आहे.

Hindenburg Report On SEBI
Hindenburg Research : भारतात काहीतरी मोठं होणार! अदानींनंतर कुणाचा नंबर? हिंडेनबर्गचा इशारा

अदानी गृप ही भारतीय कंपनी गंभीर आर्थिक गैरव्यवहारात अडकली असून अब्जावधी डॉलर्सचे छुपे व्यवहार करण्यासाठी आणि शेअरच्या किमतींमध्ये फेरफार करण्यासाठी मॉरिशस-आधारित शेल संस्थाचा वापरत करत आहे. कॉर्पोरेट इतिहासातील हा सर्वात मोठा गैरव्यवहार असल्यादा दावा हिंडेनबर्गने केला होता. या घोटाळ्यात वापरल्या गेलेल्या ऑफशोअर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्षांची हिस्सेदारी होती. एप्रिल 2017 ते मार्च 2022 पर्यंत माधबी पुरी बुच सेबीच्या पूर्णवेळ सदस्य आणि अध्यक्ष होत्या. सिंगापूरमधील Agora Partners नावाच्या सल्लागार कंपनीत त्यांची 100 टक्के भागीदारी होती. तर16 मार्च 2022 रोजी SEBI च्या अध्यक्षा म्हणून त्यांची नियुक्ती होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी, त्यांनी कंपनीतील त्यांचे शेअर्स त्यांचे पती धवल बुच यांच्या नावावर हस्तांतरित केले होते, असा धक्कादायक आरोप या अहवालात करण्यात आला आहे.

व्हिसलब्लोअरच्या कागदपत्रांनुसार, ऑबसक्योर ऑफशोर फंड्सच्या माध्यमातून अदानी गृपमध्ये पैशांचा अपहार झाला होता. आणि याच ऑबसक्योर ऑफशोर फंड्समध्ये (Obscure Offshore Funds) विद्यमान SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्या पतीची हिस्सेदाही आहे. दरम्यान अदानी समूहाविरुद्ध सादर केलेल्या अहवालाला 18 महिने उलटून गेल्यानंतरही सेबीने कारवाई करण्यात चालढकल केली आहे. मॉरिशसमधील अदानी समूहाच्या काळ्या पैशाच्या नेटवर्कची संपूर्ण माहिती देऊनही कारवाई होत नाही, उलट जून 2024 मध्ये सेबीने हिंडेनबर्गला कारणे दाखवा नोटीस बजावली, असं या अहवालात म्हटलं आहे.

Hindenburg Report On SEBI
Sunita Williams : सुनीता विल्यम्ससंदर्भात 'बॅड न्यूज'! नासाकडून धक्कादायक खुलासा

माधबी पुरी बुच यांची सेबीमध्ये पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे पती धवल बुच यांना 2019 मध्ये ब्लॅकस्टोनमध्ये वरिष्ठ सल्लागार बनवण्यात आलं. धवल बुच यांच्या Linkedln प्रोफाइलनुसार, त्यांनी यापूर्वी कोणत्याही रिअल इस्टेट संबंधित फंड किंवा भांडवली बाजारात काम केलं नव्हते. त्यांना खरेदी आणि पुरवठा साखळीचा मोठा अनुभव आहे. त्यांनी युनिलिव्हरमध्ये मुख्य खरेदी अधिकारी म्हणून बराच काळ घालवला असल्याचं म्हटलं आहे.

Hindenburg Report On SEBI
Raj Thackeray : 'जरांगेंआडून पवार-ठाकरेंचं राजकारण', राज ठाकरेंचा ठाकरे-पवारांवर निशाणा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com