Luna-25 Crash Saam tv
देश विदेश

Luna-25 Crash: चंद्रावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न भंगलं; रशियाचे लूना- 25 चंद्रयान क्रॅश

Russia's Luna-25 crashed on the Moon: रशियाचं लुना-२५ यान हे चंद्राला धडकून क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

Luna-25 Crash:

रशियासाठी एक वाईट बातमी हाती आली आहे. रशियाचं लुना-२५ यान हे चंद्रावर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियन स्पेस एजन्सी रॉसकॉसमॉसने ही माहिती दिली आहे. गेल्या ४७ वर्षातील रशियाची पहिली चंद्रमोहीम होती. (Latest Marathi News)

लुना-२५ क्रॅश झाल्याने रशियाचं चंद्रावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न भंगलं आहे. लुना-२५ लँडर हे उद्या २१ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार होतं. मात्र, त्याआधीच लुना-२५ यानामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, त्याआधीच लुना-२५ यान चंद्रावर कोसळलं.

नेमका कसा झाला अपघात?

लुना-२५ चंद्राजवळ पोहोचलं होतं. शनिवारी हे यान आणखी जवळ नेण्याचा प्रयत्न सुरू होता. लँडिगसाठी ही प्रक्रिया सुरु होती. मात्र, त्यावेळी यानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे लुना-२५ अनियोजित कक्षात पोहोचलं. पुढे लँडरचा ताबा सुटताच चंद्रावर क्रॅश झालं.

या अपघातानंतर रॉस्कॉस्मॉसमधील वैज्ञानिक लँडरचा शोध घेत होते. मात्र, त्यांना यश आलं नाही. त्यानंतर रॉस्कॉस्मॉसने लुना-२५ चंद्रावर क्रॅश झाल्याचं सांगितलं.

लुना-२५ यानाचे वैशिष्ट्ये काय होते?

Luna-25 मध्ये उच्च-शक्तीचे रॉकेट होते. या रॉकेटमध्ये जास्त इंधन वाहून नेण्याची क्षमता होती. रशियाने या यानात सोयुझ २.१ रॉकेट ठेवले होते. ते 46.3 मीटर उंच आहे. 10.3 मीटर व्यासाच्या या रॉकेटचे वजन 313 टन आहे.

सोयुझ रॉकेटमुळे लुना-25 ला पृथ्वीच्या कक्षेत थांबावे लागले नाही. रशियाचे लुना-२५ यान हे २१ ऑगस्ट रोजी चंद्रावर लँड करणार होते, पण त्याआधीच हे यान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

Shocking : खिशात पैसा नाही, मुलांसाठी दिवाळीत कपडे अन् फराळ कुठून आणू?, चिंतेतून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

Virat Kohli: विराट पुन्हा शून्यावर आऊट; एडिलेड वनडेनंतर घेणार निवृत्ती? विकेटनंतर क्राऊडला केलेल्या इशाऱ्यामुळे चर्चांना उधाण

BSNL कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी "सम्मान प्लॅन" लाँच, वर्षभरासाठी दररोज २ जीबी डेटा आणि कॉलिंग; किंमत किती?

SCROLL FOR NEXT