लखनऊच्या इंदिरानगर भागातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. घर सोडून अहमदाबादला गेलेल्या ११ वर्षांच्या मुलाचा सोमवारी रात्री शोध लागला आहे. मुलगा सोमवारी रात्री पोलीस आणि त्याच्या कुटुंबासह लखनऊला सुखरूप परतला आहे. संपूर्ण घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला कुटुंबाच्या स्वाधीन केलं आहे.
किशोर असे विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलीस तपासात असे दिसून आले की, १० डिसेंबर रोजी किशोर शाळेत कंडोम घेऊन आला होता. त्याच्या वर्गमित्रांनी हे पाहिले. तसेच मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. त्यानंतर किशोरला शाळेत फटकारण्यात आले. त्यानंतर पालकांना बोलावण्यात आले. किशोरच्या आईने त्याला घरात कानाखाली मारली. यामुळे संतापून तो सायकलवरून घराबाहेर पडला.
गाजीपूरचे एसीपी अनित्य विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरने सांगितले की तो सायकल घेऊन रेल्वे स्टेशनवर गेला. तिथे सायकल पार्क करून ट्रेनमध्ये चढला. ट्रेनमधून तो अहमदाबादला पोहोचला. अहमदाबादमध्ये तो त्याला एका कारखान्यातील कामगार भेटला. त्या व्यक्तीसोबत तो एक दिवस राहिला.
दुसऱ्या दिवशी, कामगाराच्या मदतीने त्याने फोनद्वारे वडिलांशी संपर्क साधला. तसेच घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली. कुटुंबाने ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक अहमदाबादच्या दिशेनं रवाना झाले. पोलिसांनी मुलाला लखनऊमध्ये कुटुंबाच्या स्वाधीन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.