Lucknow Crime news Saam Tv
देश विदेश

धक्कादायक! भाजप नेत्याच्या पुतण्याची चाकू भोसकून हत्या; क्षुल्लक कारणावरून संपवलं, कारण काय?

Teenage BJP Leader Relative Fatally Attacked: भाजप नेत्याच्या पुतण्याची चाकूने हत्या. आरोपींनी दारूच्या नशेत वाद करून चाकूने वार केले. लखनऊमध्ये खळबळ.

Bhagyashree Kamble

लखनऊच्या मुरादाबाद शहरातून धक्कदायक बातमी समोर येत आहे. भाजप नेत्याच्या घराबाहेर शिवीगाळ करण्यास विरोध केल्यानंतर शेजाऱ्यांनी तरूणाला चाकूने भोसकून ठार केले. १७ वर्षीय पीडित तरूण हा बारावीचा विद्यार्थी होता. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवला. पोलीस पथक आरोपीचा शोध घेत आहेत.

कटघर पोलीस ठाणे परिसरातील रहिवासी अनुराग सिंग हे भाजपच्या पश्चिम विभागाचे माजी प्रादेशिक मीडिया प्रभारी होते. त्यांचा पुतण्या विनायक सिंग हा १२ वीचा विद्यार्थी होता. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता विनायक सिंग त्यांच्या घराजवळ उभा होता.

त्यावेळी शेजारी राहणारे मनोज शर्मा यांचा मुलगा फूले कौशिक दारूच्या नशेत आला. त्यानं विनायकला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तेव्हा विनायकने याचा विरोध केला. मनोज शर्माच्या मुलाला राग अनावर झाला. आरोपीनं त्यावेळेस ओरडून अनंग कौशिक, वडील मनोज, काका अनिल कौशिक यांना बोलावून घेतलं.

यादरम्यान, मारहाण आणि बाचाबाची झाली. हल्ल्यादरम्यान, आरोपीनं विनायकच्या पोटात चाकू खुपसला. तरूण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर विनायकचे घरचे घटनास्थळावर पळत गेले. कुटुंबियांनी जखमी विनायकला खासगी रूग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासून विनायकला मृत घोषित केलं.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, दिवसा फुले यांनी मंगळवारी परिसरात गोंधळ घातला. दुचाकीच्या धडकेचा वाद होता. फुले याने विनायकचा मोठा भाऊ अभिषेकला धमकी दिली होती. त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिलीहोती. सायंकाळी आरोपीनं अभिषेकच्या छोट्या भावाची हत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या माणगावमध्ये कोसळल्या पावसाच्या सरी

शरद पवार गटाला धक्का; २ बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटाच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार

Shocking : मुंबईत रक्तरंजित थरार! हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर बॉयफ्रेंडनेही आयुष्य संपवलं

EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

SCROLL FOR NEXT