ऐन दिवाळीत कोल्हापुरात अघोरी प्रकार; जनावराचं काळीज पांढऱ्या कापडात बांधलं, बाजूला कुंकू, हळद अन्...

Shocking Aghori Ritual Discovered in Kolhapur's Ingali Village: कोल्हापूरच्या इंगळी गावात अघोरी प्रकार. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण.
Shocking Aghori Ritual Discovered in Kolhapur's Ingali Village
Shocking Aghori Ritual Discovered in Kolhapur's Ingali VillageSaam Tv
Published On
Summary
  • कोल्हापूरच्या इंगळी गावात अघोरी प्रकार.

  • पांढऱ्या कापडात जनावरचं काळीज बांधून ठेवलं.

  • आजूबाजूला हळद अन् कुंकू.

  • ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण.

कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंगळी गावाच्या हद्दीत एक अघोरी प्रकार घडला. गावातील कमानी जवळच जनावराचं काळीज पांढऱ्या कपड्यात बांधून ठेवलं होतं. त्याच्या भोवती कुंकू, गुलाला आणि लिंबू ठेवण्यात आलं होतं. पहाटेच्या सुमारास हा सर्व प्रकार उघडकीस आला. हा प्रकार उघडकीस येताच गावात भीतीचे वातावरण पसरलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावातील हद्दीतून हा अघोरी प्रकार उघडकीस आलाय. इंगळी गावाच्या कमानी जवळ हा भयंकर प्रकार उघडकीस आला. जनावराचं काळीज एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यात बांधून ठेवलं होतं. त्या कापडाच्या भोवती कुंकू, गुलाल, लिंबू , केळी आणि केळीचं पान ठेवलं होतं.

Shocking Aghori Ritual Discovered in Kolhapur's Ingali Village
लाडक्या बहिणींना भाऊबीज कधी मिळणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्वाची अपडेट

पहाटेच्या सुमारास हा प्रकार समोर आला. कुणीतरी अघोरी पूजा केली असल्याचा संशय ग्रामस्थांना आहे. हे प्रकरण उघडकीस येताच इंगळी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने गावात धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली,.

Shocking Aghori Ritual Discovered in Kolhapur's Ingali Village
डोक्यावर हेल्मेट नाही, हँडलवर हात न ठेवता तरुणीने सुसाट बाईक पळवली, धोकादायक स्टंटबाजीचा VIDEO व्हायरल

या अघोरी प्रकरणात पोलिसांनी पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या पाच संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, हा अघोरी प्रकार कुणी आणि का केला? याचा ही तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com